राकेश रत्नावार यांची नगरपरिषद मूलच्या उपाध्यक्ष पदी अविरोध निवड.

 राकेश रत्नावार यांची नगरपरिषद मूलच्या उपाध्यक्ष पदी अविरोध निवड.



दीपक देशपांडे 

मूल शहराच्या विकासासाठी आक्रमक धोरण राबवण्याचा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केला आहे. येत्या काळात मूल नगरपरिषदेत विकासकामांना गती मिळणार असल्याचे संकेत  या निवडीने दिले आहेत.

दिनांक ७ जानेवारीला मूल नगरपरिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवक यांची पहिली सभा आयोजित करण्यात आली होती,या सभेत राकेश रत्नावार यांची नगरपरिषद मूलच्या  गटनेतेपदी आणि उपाध्यक्ष पदी अविरोध निवड करण्यात आली, यानंतर आपल्या कार्याची दिशा स्पष्ट करताना राकेश रत्नावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मूल नगरपरिषदेच्या सत्ताकारणात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून, दोन दिवस  उठलेल्या वावड्यांना पूर्णविराम मिळाला आहे, काँग्रेसच्या नगराध्यक्षा एकता समर्थ  या नवख्या असल्या तरी आक्रमक युवा नेतृत्व राकेश यादवराव रत्नावार यांची  उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे आणि अनुभवी  नगरसेवक प्रशांत समर्थ सोबतीला असल्याने , यावेळी  नगरपरिषदेत काँग्रेसची पकड अधिक भक्कम  मानली जात असली तरीही विशेष म्हणजे या सगळ्यांना माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचे व हे त्यांचे अत्यंत विश्वासू असल्याचे बोलले जात आहे.

 अल्पवयात राजकारणात पाऊल ठेवून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन करणारे रत्नावार यावेळी पाचव्यांदा उपाध्यक्षपदी  विराजमान  होत मूलच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व बनले आहेत.

काँग्रेसचे प्रदेश महासचिव  संतोषसिंह रावत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले रत्नावार हे संघटनात्मक ताकद आणि आक्रमक निर्णयक्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, मूलच्या सभापतीपदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले आहेत. शेतकरी हिताचे धाडसी निर्णय घेतले असल्याने ग्रामीण भागात त्यांनी मजबूत पकड निर्माण केली आहे. 
२०२५च्या नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह तब्बल १८ नगरसेवक निवडून आणत विरोधकांचे गणित पूर्णपणे बिघडवले आहे. या पार्श्वभूमीवर राकेश रत्नावार यांची उपाध्यक्षपदी निवड म्हणजे काँग्रेसचे मूलच्या सत्ताकारणातील  पुन्हा वर्चस्व  प्रस्थापित होणार असल्याचे संकेत  आहेत असे  बोलले जात आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर, माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली व मूल च्या नगराध्यक्षा एकता समर्थ व सर्व नगरसेवक यांच्या सहकार्यातून मूल शहराच्या विकासासाठी आक्रमक धोरण राबवण्याचा निर्धार नवनियुक्त उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी केला आहे. त्यासाठी आता येणाऱ्या काळात मूल नगरपरिषदेत विकासकामांना गती  मिळणार असून  कर्मचाऱ्यांना  तयार राहण्याचे  संकेत  दिले गेले आहेत  व विरोधकांच्या सभेतील विकास  थांबेल असे वक्तव्य कसे चुकीचे होते हे लवकरच जनतेसमोर येणार असल्याचे स्पष्ट होणार आहे. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती त्या चर्चेला कधी पूर्णविराम मिळणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लवकरच मूलची जनता  सत्यता अनुभवणार आहे असा विश्वास  नवनियुक्त सत्ताधारी करीत आहेत.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.