शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सदतीसावी बैठक संपन्न
शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची सदतीसावी बैठक संपन्न
मूल: दीपक देशपांडे.
कृषी महाविद्यालय, मूल द्वारा आयोजित सदतीसवी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक दिनांक ३० डिसेंबर, २०२५ मंगळवार रोजी ग्राम चिचाळा ता. मूल जि. चंद्रपूर येथे संपन्न झाली. याप्रसंगी कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, प्रगतशील शेतकरी श्री रविंद्र गुरुनुले, श्री एकनाथ लेनगुरे, इतर शेतकरी बांधव तसेच कृषी महाविद्यालय, मूल येथील विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने “भात काढणीनंतर रब्बी हंगामात विविध पिकांची लागवड व अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे एक साधन” या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी, शेतीत होणाऱ्या खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रब्बी हंगामात जवस, मोहरी, करडई या पिकांची लागवड करताना योग्य वाणाची निवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतीतील शाश्वत उत्पादनासाठी माती परीक्षण करणे काळाची गरज आहे तसेच अळिंबी उत्पादन पर्यायी उत्पनाचे एक साधन आहे असे सांगितले. डॉ. एस. वाय. कडू, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी शेतकऱ्यांनी पारंपारिक उन्हाळी धान ऐवजी वांगे, टमाटर, कोथिंबीर, मेथी यासारख्या भाजीपाला पिकांची कमी खर्च करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्याकरिता भाजीपाला पिकांची लागवड सुधारित तंत्रज्ञानाच्या वापर करण्याबाबत
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment