ऊर्जानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबांचा स्मृतीदिन महोत्सव.
ऊर्जानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगेबाबांचा स्मृतीदिन महोत्सव
दि.०३ व ०४ जानेवारी २०२६ ला विविध कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपुर : दीपक देशपांडे.
चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र येथील श्री गुरूदेव सेवा मंडळ,ऊर्जानगरच्या वतीने कामगार मनोरंजन केंद्र ऊर्जानगर येथे वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा ५७ वा व वैराग्यमुर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा ६९ वा स्मृतीदिन महोत्सव दिनांक ०३ व ०४ जानेवारी २०२६ ला आयोजित केला आहे. वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी सांगीतलेले ग्रामगीतेतील तत्वज्ञान जनता-जनार्धनापर्यत पोहचविण्याकरीता दोन दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि.०३ जानेवारी सकाळी ५:३० वा. सामुदायिक ध्यानपाठ व चिंतन,६:३० वा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व कलश पुजन, सायं ७:३० ला
"सर्वधर्म ग्रंथदिंडी व भव्य मिरवणूक", सहभाग विद्यामंदिर हायस्कूल ऊर्जानगर तथा मातोश्री विद्यालय तुकुम,सकाळी १०.३० पासून भव्य रांगोळी स्पर्धा, दुपारी १२ वाजता सर्वधर्म ग्रंथदिंडी व भव्य मिरवणूक समारोप,दुपारी १ वाजता एकेरी गीतगायन संमेलन व ग्रामगीता ओव्या मुखोदय पठण आणि सायं ५:३० वाजता सामुदायिक प्रार्थना व सायं ७ वा मा.डाँ. संगीता बोदलकर वैद्यकीय अधीक्षक सी टी पी एस दवाखाना यांचे अध्यक्षतेत "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,फातिमा शेख व राजमाता जिजाऊ संयुक्त जयंती समारोह", या कार्यक्रमाचे अर्चना विजय राठोड मॅडम याचे हस्ते उदघाटन होणार आहे. प्रमुख वक्त्या मा.सुश्री गंगाताई काकडे व मा.एड.अश्विनी मुन नागपूर ह्याचे संयुक्त जयंती समारोहाला मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमाला ऊर्जानगरातील विविध महिला मंडळाच्या महिला सहभागी होणार आहे.
रविवार दि.०४ जानेवारीला स ५:३० वा. सामुदायिक ध्यानपाठ व चिंतन, सकाळी ६:३० वाजता "सामुदायिक ग्रामगीता वाचन, सकाळी ९ वाजता पासून बालकांकरिता चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल.सकाळी ९:३० वाजता नियोजित खंजिरी भजन संमेलन,दुपारी ३:३० वाजता "श्रद्धांजलीपर भजन" सादरकर्ते श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ, ऊर्जानगर, सायं ठीक ४:५८ मि. नी वंदनिय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना "मौन श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे नंतर सर्वधर्मीय प्रार्थना" लगेच सामुदायिक प्रार्थना,सायं ७ वाजता मा.सूबोधदादा संचालक भूवैकुंठ अड्याळ टेकडी ब्रम्हपुरी यांच्या अध्यक्षतेखाली व उदघाटक मा.विजय राठोड मुख्य अभियंता सी एस टी पी एस तसेच प्रमुख अतिथी उपमुख्य अभियंता रविंद्र सोनकुसरे,, मधुकर तायडे,अधीक्षक अभियंता दिलीप सराग यांच्या उपस्थितीत सायं ७:०० वा ससमारोपीय कार्यक्रम व विविध घेण्यात आलेल्या स्पर्धेचे "बक्षिस वितरण" होणार आहे.रात्री ८ वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखजिरीवादक राष्ट्रीय प्रबोधनकार मा. तुषार सूर्यवंशी नागपूर यांचा तुफानी विनोदी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी याचा ऊर्जानगरवासीय व परिसरातील आबालवृंदांनी,गुरुदेवप्रेमींनी, माता-भगीनिंनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे श्री गुरूदेव सेवा मंडळ ऊर्जानगर तर्फ आवाहन करण्यात येत आहे असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment