राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन.

कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन.



मूल, दीपक देशपांडे.

कृषि महाविद्यालय मूल आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीराचा उदघाटन समारंभ आज दिनांक. ०३/जानेवारी २०२६ रोजी राजगड, ता. मूल, जि. चंद्रपूर या गावी संपन्न झाला. या कार्यक्रमाला श्रीमती जयश्रीताई गुज्जनवार मॅडम, विस्तार अधिकारी, शिक्षण ह्या उदघाटक म्हणुन लाभल्या तसेच श्री. रविन्द्र चौधरी, सरपंच, राजगड, श्री. चंदूपाटील मारकवार, उपसरपंच, राजगड  हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमाला सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावकरी मंडळी व महाविद्यालयाचे प्राध्यापक , विद्यार्थी तथा कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नागेश नवघरे सर यांनी केले, प्रास्ताविक डॉ. आशीष लाडे सर यांनी केले तसेच आभार डॉ. सुवर्णा नगराळे मॅडम यांनी केले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.