लेखक अविनाश पाठक यांचा "साहित्यरंग" मध्ये सहभाग
लेखक अविनाश पाठक यांचा "साहित्यरंग" मध्ये सहभाग
मुंबई परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मिती ग्रुपने युट्युबवर *"साहित्यरंग"* हा कार्यक्रम सुरू केला आहे. दर शुक्रवारी "साहित्यरंग" चा एक एपिसोड युट्युब वर येत असतो. त्यात प्रचलित साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आयोजकांचा हेतू असतो. प्रत्येक भागात एक लेखक आणि एक कवी असे निमंत्रित केले जातात आणि त्यात त्यांच्या साहित्याचे काही अंश सादर करत त्यावर भाष्य देखील केले जाते. आतापर्यंत या साहित्य रंगाचे ३९ भाग प्रसारित झाले असून चाळीसावा भाग देखील शुक्रवार दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसारित झाला आहे.
या भागात *विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अविनाश पाठक* तसेच हैदराबादचे कवी आणि गझलकार व्यंकटेश कुलकर्णी यांचा सहभाग असून त्यावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती *डॉ. नीलम गो-हे* यांनी भाष्य केलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दूरदर्शन आणि आकाशवाणी मंच संचालिका आणि मिती ग्रुपच्या संचालिका *उत्तरा मोने* यांनी केले आहे.
अविनाश पाठक यांची आतापर्यंत १५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील *"माझ्या खिडकीतले आकाश"* या ललित लेखासंग्रहातील *"डोळस गांधारी"* या लेखातील काही अंश तर त्यांनीच लिहिलेल्या *"पूर्णांक सुखाचा"* या लघु कादंबरीतील काही अंश त्यांनी या कार्यक्रमात सादर केले आहेत, तर व्यंकटेश कुलकर्णी यांनी देखील काही आपल्या कविता आणि गजला सादर केलेल्या आहेत.
https://youtu.be/tNjHqgbo2gw?si=j9ozjYB1WwdB1zm6
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment