देवनिल विद्यालय टेकाडी येथे क्रीडा व सांस्कृतिक सम्मेलन संपन्न
देवनिल विद्यालय टेकाडी येथे क्रीडा व सांस्कृतिक सम्मेलन संपन्न
दीपक देशपांडे.
विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मछल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी यादृष्टीने विज्ञान मेळावा, विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा, वर्ग सजावट, पुष्प प्रदर्शन आणि माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला.क्रीडा स्पर्धेत सांघिक खेळ कबड्डी, खोखो, लंगडी,व्हालीबाल, क्रिकेट, बॅडमिंटन यासह वैयक्तिक खेळ१००मी,२००मी,४००मी,६००मी,८००मी,३किमी धावणे, बुद्धीबळ, स्लो सायकल, दोरीवरच्या उड्या, गोळा फेक,थाळी फेक, चमचा गोळी, लांब उडी, एक मिनिट स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञान प्रदर्शनात ४० प्रतिकृती सादरीकरण केले, तसेच आनंद मेळाव्या मध्ये वेगवेगळे ३५ प्रकारचे पदार्थ बनवून विद्यार्थ्यांनी उत्साहात आनंद मेळावा साजरा केला.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन टेकाडीचे सरपंच सतिश चौधरी आणि माजी सभापती रेखाताई गद्देवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन व डॉ .ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मालार्पणने करण्यात आले तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील प्रमोदजी बोमनवार, सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर कुणघाडकर,मुख्याध्यापक किरण खोब्रागडे, दिव्यांग विद्यार्थी मार्गदर्शक डांगे, धोडरे ,पारस यांची उपस्थिती होती.
दिनांक ३जानेवारी २०२६ रोज शनिवारला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने बालिका दिन,माजी विद्यार्थी मेळावा आणि क्रीडा व सांस्कृतिक संमेलनाच्या समारोपिय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून माजी विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात येऊन विजेत्या माजी विद्यार्थ्यासह , क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचेही गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवर मंडळींच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवरावजी भांडेकर अध्यक्ष विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मूल ,विशेष अतिथी डॉ.स्मिताताई भांडेकर तर अतिथी म्हणून प्राचार्य रमेश मंडलवार, मुख्याध्यापक राजेश सावरकर,माजी विद्यार्थी ईश्वर जराते अध्यक्ष व्यवस्थापन समिती, रवि चौधरी, मंगेश पोटवार,शरद गणवीर, विनोद गोहणे, अंबादास मांदाडे, मनोहर मेश्राम, संतोष मस्कावार, विलास जक्कुलवार, प्रमोद भोयर, अमोल करपे, धनराज वेटे, सचिन कोल्हटवार, कुंदन मोहुर्ले सरीता पोटवार,प्रतिमा मस्कावार , पौर्णिमा शेंडे, पल्लवी वेटे,वैशाली कुंभमवार, आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर यांनी केले तर सुत्रसंचालन अंकिता चहांदे आणि आभार प्रदर्शन वैशाली भांडेकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षक नामदेव पिजदुरकर, संदिप धाबेकर, मनोहर मडावी, गणेश श्रीरामे, सुशिला उडान, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम, भुपेश भोयर, सचिन कोल्हटवार, विद्यार्थी प्रतिनिधी साहिल मांदाडे, समृध्दी नागोसे आणि आनंद भोयर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment