दिनविशेष:-राष्ट्रीय शेतकरी दिन
दिनविशेष .
राष्ट्रीय शेतकरी दिन
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही आमच्यासाठी योग्य आहार असलेले अन्नधान्य हे शेतातच पिकणार. हे पिकवतो तो शेतकरी राजा.यामुळेच भारतीय संस्कृतीत शेतकरी राजाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. आमचे ऋषीही शेती करायचे.. गुरुकुलातही शेतीसाठीचे प्रशिक्षण दिले जायचे.
शेतकऱ्याना अनेकदा नैसर्गिक प्रतिकूल वातावरणाशी संघर्ष करावा लागतो. अत्यंत कष्टाळू.. मायाळू.. उदार.. निसर्ग रक्षक अशी शेतकरी वर्गाची महती.
शेतकरी आपल्या सण उत्सवातही डोंगर.. नद्या.. पशुपक्षी सर्वांवर प्रेम करायला शिकवतात. ते पिकात बदल करून जैववैविधता टिकवतात. पर्यावरण समतोल राखत मानवी तसेच पशुजीवन सुरक्षीत ठेवतात. गोधन पाळून जनतेला अत्यंत शुद्ध दुधदुभते उपलब्ध करतात. नैसर्गिक शेती करून मानवी आरोग्याची काळजी घेतात.
भारतीय जनता सदैव त्यांच्याविषयी कृतज्ञ आहे. याच शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी प्रयत्न करणारा आजचा दिवस.
भारताचे माजी पंतप्रधान.. स्वातंत्र्य सैनिक.. शेतकरी नेते मा. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच्या केलेल्या कार्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा 'राष्ट्रीय शेतकरी दिन' म्हणून देशभर साजरा होतो.
भारतीय शेतकरी दिन (Kisan Diwas) २३ डिसेंबर रोजी साजरा होतो, जो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांना 'शेतकऱ्यांचा नेता' म्हणून ओळखले जाते आणि या दिवसाद्वारे शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान केला जातो. महाराष्ट्रात याव्यतिरिक्त १ जुलै रोजी 'महाराष्ट्र कृषी दिवस' साजरा होतो, जो 'हरितक्रांतीचे जनक' वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त असतो.
शेतकऱ्यांना केलेल्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा.. शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत म्हणून शेतीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध व्हावीत, कमी दरात कर्ज.. किटकनाशके, खते उपलब्ध व्हावीत.. पशुपालनास मदत व्हावी.. शेतीसाठी बारमहा पाण्याची सोय व्हावी.. शेतकऱ्यांकडून शेतमाल हा ग्राहकांना थेट मिळावा.. फळभागातील फळांपासून पेय व इतर प्रक्रिया उद्योग निर्माण व्हावेत.. उसापासून इंधन तयार व्हावे.. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन मिळावे.. शेतमाल साठवणूक सोयी वाढाव्यात.. शेतमाल निर्यात वाढावी.. शेती पर्यटनाला चालना देणे अशा अनेक प्रयत्नांचा आढावा घेतला जातो. नवनवे उपाय शोधले जातात.
शेती.. संबंधित उद्योग यावर देशातील ७०% जनता अवलंबून आहे. अपवाद सोडता बहुतेक सगळेच उद्योग शेतमालावरच चालतात. सर्वाधिक रोजगार देणारी ही आमची शेती.
उन.. पाऊस.. वादळवारे सहन करुन कष्टणारे आमचे शेतकरी बांधव. पशुनाही कुटुंब सहकारी मानून त्यांची काळजी घेणारे विशाल हृदयी हे शेतकरी बांधव. या शेतकऱ्यांचे कर्म हे मोठे पुण्यकर्म समजले जाते.
जेव्हा अत्याधुनिक सोयी नव्हत्या, तेव्हाही कष्टाने मोटेने पाणी ओढून शेतकऱ्यांनी जगाला जगवले. त्याच्या कष्टाने आलेले पिक हे कुबेराचे धनच वाटते. जगाच्या या पोशिंद्याच्या आनंदाचे हे गीत. शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकरी सुखी.. संपन्न आनंदी व्हावा हेच आमचे ध्येय.
शेतकरी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.. !!
*!! जय जवान, जय किसान !!*
*देवावाणी शेत माझं,*
*नवसाला पावलं*
*कुबेराचं धन माझ्या शेतात घावलं*
*झाकली मूठ ही मिरगानं फेकली*
*निढळाची धार ती सर्गानी शिंपली*
*बाळरूप कोवळं शिवारात हासलं*
*धरतीच्या माऊलीनं*
*दिनरात पोसलं*
*तरारुन आला भरा गहू हरभरा*
*शाळूराजा डुलतोय*
*झुलवीत तुरा*
*तरुणपण जवारीनं*
*पानाआड झाकलं*
*चोच मारून पाखरू*
*पिकामधी लपलं*
*भलरी दादा भलगडी दादा*
*भलरी दादा भलं*
*मोटेवरी रंगली ढंगदार लावणी*
*घुमवीत गोफणी*
*सुरू झाली राखणी*
*लक्षुमी ही देखणी रूप तिनं दावलं*
*दिवसाच्या डोळियात*
*नाही बघा मावलं*
*कुबेराचं धन माझ्या*
*शेतात घावलं*
*भलरी दादा भलगडी दादा*
*भलरी दादा भलं*
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment