कृषि महाविद्यालय, मूल येथे जागतिक एड्स दिन जनजागृती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम.

 कृषि महाविद्यालय, मूल येथे जागतिक एड्स दिन जनजागृती व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम.



दीपक देशपांडे .

राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत कृषि महाविद्यालय, मूल येथे जागतिक एड्स दिन तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS विषयी जनजागृती करणे व तंबाखू व इतर व्यसनांपासून दूर राहण्याबाबत सजगता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मूल हे होते. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांनी उपाध्यक्षस्थान भूषविले. मा. मीना नंदनवार, ICTC समुपदेशक, उपजिल्हा रुग्णालय मूल तसेच मा. ममता शेंडे, NCD समुपदेशक,उपजिल्हा रुग्णालय मूल  ,  या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष होमराज लाडे, सहायक प्राध्यापक यांनी केले.

यावेळी मा. मीना नंदनवार यांनी एड्सविषयी माहिती देताना त्यासंबंधीचे गैरसमज, संक्रमणाचे मार्ग, लक्षणे व प्रतिबंधक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच HIV बाधित रुग्णांच्या हितासाठी शासनाने राबविलेल्या कायदे व योजनांची माहिती दिली. मा. ममता शेंडे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, व्यसनांचे विविध प्रकार, युवकांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांची कारणे व आरोग्यदायी जीवनशैली यावर मार्गदर्शन करून उपस्थितांकडून व्यसनमुक्तीची शपथ घेतली. डॉ. आर. पी. गजभिये यांनी संत कबीरांच्या उदाहरणातून आत्मसंयमाचे महत्त्व विशद केले, तर अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी सकारात्मक जीवनमूल्ये अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. गीतांशू डिंकवार, सहायक प्राध्यापक यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.