देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग, मूल (आकापूर) येथे शपथविधी सोहळा संपन्न

 देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग, मूल (आकापूर) येथे शपथविधी सोहळा संपन्न 

मूल, दीपक देशपांडे.

परिचारिका ही रुग्णालयाचा कणा आहे, कुठल्याही परिस्थितीत न डगमगता रुग्णसेवा करणे हे परिचारिकेचे आद्य कर्तव्य आहे. असे आवाहन डॉ. वासुदेवराव गाडेगोणे यांनी केले. तसेच विशेष अतिथी डॉ. प्रेरणा कोलते यांनी रुग्णालय व रुग्ण यातील दुवा म्हणजे परिचारिका असे संबोधित केले. प्रमुख अतिथी डॉ. मोनिका कोतपल्लीवार यांनी परिचारिकेशी प्रेमाने व सहानुभूतीने वागावे असे मार्गदर्शन केले.

         कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. देवरावजी भांडेकर यांनी परिचारिकेने रुग्णाला उच्च दर्जाची रुग्णसेवा द्यावी असे मार्गदर्शन केले.

        देवनील शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित मूल (आकापूर) येथील देवनिल कॉलेज ऑफ नर्सिंग येथे बी. एस.सी. नर्सिंग, जी. एन.एम व ए.एन. एम. मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व क्रीडा संमेलनाचे आयोजन करून बक्षिस वितरण करण्यात आले.

        याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. देवरावजी भांडेकर (माजी आमदार), उद्घाटक डॉ. वासुदेवराव गाडेगोणे विशेष अतिथी डॉ. नरेंद्र कोलते, डॉ. प्रेरणा कोलते, प्रमुख अतिथी डॉ. मोनिका कोतपल्लीवार, डॉ. स्मिता भांडेकर, डॉ.महेश भांडेकर, प्राचार्य भावना टेकाम व शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती. मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

       प्राचार्य भावना टेकाम यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे संचालन फाक्गुनी जराते, मनाली घुबडे या विद्यार्थिनींनी केले. तर आभार रोहिणी कामीडवार या विद्यार्थिनींनी मानले.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.