मोरवाही गावालगत वाघाच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू, नागरिकांना धोक्याची घंटा!
मोरवाही गावालगत वाघाच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू, नागरिकांना धोक्याची घंटा!
दीपक देशपांडे मूल तालुक्यातील मौजा मोरवाही येथे मंगळवारी सायंकाळी पाच-साडेपाचच्या दरम्यान अगदी गावाजवळ शेतशिवारात वाघाने हल्ला चढवून एका माकडाला ठार केल्याची घटना उघडकीस आली, आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मोरवाही हे गाव जंगलाने वेढलेले असून तसा या गावाचा बाहेरच्या जगाशी फारसा संबंध नव्हता मात्र बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून विकासनिधीतून मूलच्या उमा नदीवर झालेल्या उंच पूलामुळे हे गाव जगाशी जोडले गेले आणि मूल व बेलगाटा या महामार्गावरील गावांशी जोडले गेले परिणामी या गावातून रहदारी वाढली असून दूचाकी व चारचाकी वाहने या मार्गावर रस्ता चांगला असल्याने मोठ्या प्रमाणात चालतात , आणि सद्यस्थितीत सगळीकडे मळणीची कामे सुरू असल्यामुळे शेतकरी शेतात रात्री उशिरापर्यंत येजा करीत असतात यांशिवाय शेतात जागली जाऊन मुक्कामही करतात अशा परिस्थितीत दोनच दिवसांपूर्वी बेलगाटा येथील रहिवासी असलेल्या गुराख्यावर हल्ला करून वाघाने ठार केले होते ही घटना ताजी असतानाच काल सायंकाळी अगदी गावाजवळ झालेल्या हल्ल्यात एका माकडांचा मृत्यू झाल्याने मोरवाही,चितेगाव व बेलगाटा येथील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत व घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, वनकर्मचारी यांचा गस्त वाढवावा व शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
वनविभाग ही मागणी मान्य करणार की याबाबिकडे दूर्लक्ष करुन एखाद्या मोठ्या घटनेची वाट बघत राहणार असा संभ्रम निर्माण झाला असल्याची बाब ग्रामस्थांनी आमच्या सोबत बोलताना व्यक्त केली.
शासनाच्या वतीने तातडीने या वाघाचा बंदोबस्त करावा व तातडीने गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment