वाघाच्या हल्ल्यात.... दोन ठार!
वाघाच्या हल्ल्यात ... दोन ठार!
दीपक देशपांडे
चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचीत असला तरीही वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जनजीवन आक्रोषित झाले असून वनविभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात विरोध वाढिस लागला असल्याचे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या दोन घटनांमुळे दिसून येत आहे.
पहिली घटना :-मूल तालुक्यातील बेलगाटा येथील रहिवासी पितांबर गुलाब सोयाम वय ३७ वर्षे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दिनांक १३ डिसेंबरला दुपारी सोयाम हा गुरे चारायला जंगलात गेला होता, मात्र सायंकाळ होऊनही तो घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी गावात व परिसरात शोध मोहीम राबवली परंतु तो आढळला नाही. रात्री घरी परत न आल्यामुळे त्यांनी वनविभागाला माहिती दिली.
रविवार दिनांक १४ डिसेंबरला सकाळी गावकरी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जंगलात शोध मोहीम राबवली असता त्यांचा मृतदेह कन्हाळगाव बिटातील कक्ष क्रमांक १७६५ या जंगलात आढळून आला. यावेळी त्यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचे निदर्शनात आले. या घटनेमुळे बेलगाटा व आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले असून सध्या धानाचे मळणीची व कापूस वेचणीची कामे सुरू असल्यामुळे व या भागातील शेतजमीन वनपरिसराला लागून असल्याने वनविभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांनी केलेली आहे.दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment