राम'व्यथा' ७ ✍️विनोद देशमुख बंदिवासापाठोपाठ ३२ वर्षांचा वनवास

 राम'व्यथा' ७ ✍️विनोद देशमुख

बंदिवासापाठोपाठ 

३२ वर्षांचा वनवास

-🚩 १५२८ मध्ये बाबरच्या सुभेदारानं श्रीरामजन्मभूमी मंदिर जमीनदोस्त करण्याआधीच रामललाची मूर्ती तिथून हटविण्याचं श्यामानंद महाराजांना सुचलं कसं आणि या विध्वंसाचा सुगावा त्यांना आधीच कसा लागला, हे दोन प्रश्न फार महत्त्वाचे आहेत.‌ त्यातील पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातून हिंदू समाजाची सहिष्णुता, उदारता यांचा अतिरेक लक्षात येतो. (हे हिंदू समाजाला अनेकदा महागात पडून सुद्धा आपले अनेक लोक अजूनही सुधारत नाहीत, हे दुर्दैवाचे)  

श्यामानंद महाराजांनी अत्यंत उदार मनानं दोन सूफी फकिरांना शिष्य करून घेतलं. त्यापैकी एकाचं नाव होतं ख्वाजा कजल अब्बास मूसा आणि दुसऱ्याचं जलालशाह. हे दोघंही वेगळा, दुष्ट इरादा घेऊनच श्यामानंदांकडे आले होते, हे नंतर सिद्धच झालं. शिष्यत्व पत्करून गुरूचा विश्वास संपादन केल्यावर या दोघांनी पहिलं काम केलं ते श्रीरामजन्मभूमी परिसरातील जागेत दफनविधी सुरू करण्याचं ! हळूहळू या भागात कब्रस्तान तयार झालं😣 (याच कब्रस्तानाचा उल्लेख नंतरच्या खटल्यांमध्ये झाला !) 

अशी 'पूर्वतयारी' झाल्यावर हे दोन्ही फकीर आगऱ्याला जाऊन बाबरला भेटले. "अयोध्येचं श्रीरामजन्मभूमी मंदिर पाडून ती जागा ताब्यात घ्या आणि तेथे मशीद उभारा" अशी मागणीवजा सूचना करून त्यांनी बाबरचे कान भरले. त्याचीच परिणती १५२८ मध्ये मंदिराच्या विध्वंसात झाली. बाबरनं स्वत: हे मंदिर पाहिलं नसलं तरी, त्यानं आदेश दिला म्हणूनच सुभेदार बकी बेग ताश्कंदी यानं मंदिर पाडलं, हे उघड आहे. इकडे, आपल्याच शिष्यांची ही बेईमानी अन् कटकारस्थान याची कुणकुण श्यामानंद महाराजांना, कशी कुणास ठावूक, लागली. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि रामललाविषयी चिंतेत पडले. शेवटी एका मध्यरात्रीच्या अंधारात संधी साधून त्यांनी रामललाची बालमूर्ती मंदिरातून उचलली आणि लगतच्या शरयू नदीत विसर्जित करून ते अज्ञातवासात निघून गेले. त्यामुळे सोमनाथच्या शिवलिंगासारखीच विटंबना रामललाच्याही नशिबी येणं पुढची ४२१ वर्षे टळलं.

हीच मूळ मूर्ती २२-२३ डिसेंबर १९४९च्या रात्री बाबरी मशिदीच्या मधल्या घुमटाखालील गर्भगृहात परत आली, अशी रामभक्तांची परंपरागत भावना आहे. रामललाची ही मूर्ती ६डिसेंबर १९९२ पर्यंत, म्हणजे ४३ वर्षे, तेथेच 'बंदिस्त' होती कारण, सरकारनं हा संपूर्ण परिसर वादग्रस्त ठरवून गर्भगृहाच्या दरवाजाला कुलूप ठोकलं, हिंदूंना दर्शनाची आणि सकाळ-संध्याकाळ पूजेची परवानगी दिली आणि मुस्लिमांना ५०० मीटरच्या आत प्रवेश करण्यास बंदी केली. पुढे ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांच्या आंदोलनात बाबरी मशीद पडल्यानंतर त्याच परिसरातील ढिगाऱ्यावर लगोलग एक तात्पुरते शेड उभारून ही मूर्ती तेथे स्थापित केली गेली अन् सुरू झाला रामललाचा  गर्भगृहाबाहेरील ३२ वर्षांचा (१९९२ ते २०२४ असा) नवा वनवास😞

पुढच्या भागात... नायर भिडले सरकारशी !


✍️ विनोद देशमुख✍️

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.