वैश्विक ग्रंथाच्या जयंतीची ...आज गीता जयंती

   वैश्विक ग्रंथाच्या जयंतीची

      आज गीता जयंती



       कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

        मा कर्मफलहेतूर्भू मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥     

       भारताकडे जग विश्वगुरु म्हणून बघते. याचे कारण समस्त मनावाला सुखाने जगण्याची हमी.. शिक्षण देणारा संस्कारी असा भगवत गीता हा जगमान्य पवित्र ग्रंथ आमच्याकडे आहे. गीतेला ना धर्मबंधन ना सीमांचे बंधन. याचे महत्व एवढे की न्यायालयात पण यावर हात ठेवून शपथ घेतली जाते.

        आज मोक्षदा एकादशी. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं रणभूमिवर अर्जुनाला गीता सांगितली. पाच हजार वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितलेल्या या गीता ग्रंथाची जयंती आज जगभर साजरी होतेय. असा बहुमान असलेला हा एकमेव ग्रंथ.     

        गीता हा महाभारतातील भीष्म पर्वाचा भाग. भगवान श्रीकृष्णानं जगातील प्रत्येकच विमनस्क.. व्दिधा मनस्थितील अर्जुनासाठी केलेला उपदेशाचा ठेवा. "धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।" या श्लोकाने प्रारंभ होणारी गीता.       

       गीतेत ज्ञान योग.. भक्ती योग, कर्म महात्म्य सगळीच शास्त्र आहेत. समस्त मानवाच्या कल्याणाठीचा हा गीतोपदेश. एकीकडे अहिंसा सांगणारी गीता. पण जीवन मुल्ये पायदळी तुडवणारे.. भूमी.. धन.. स्त्री हडप करणारे गुन्हेगार कितीही जवळचे नातेवाईक असोत त्यांना आणि पाठीशी घालणाऱ्यांचा वधच हवा असेही सांगून जग सुरक्षित ठेवते.            

        गीता तत्त्वज्ञानावरच भारतीय स्वातंत्र्य लढा लढला गेला. गीता म्हणजे ज्ञानाचा महासागर. शंकराचार्य.. स्वामी विवेकानंद.. योगी अरविंद.. लोकमान्य.. म. गांधीजी.. विनोबा इ. अनेक जणानी गीता तत्त्वज्ञान स्विकारले. जगभार गीतेवर कित्येक ग्रंथ तयार झाले. माऊलींची ज्ञानेश्वरी.. विनोबाजींची गीताई या भाष्य ग्रंथानी देशाला दिशा दिली. गीतेवरच्या ज्ञानेश्वरीने वारकरी चळवळ उभारली गेली. खेडोपाडी गीता तत्त्वज्ञान रुजले. गीतेचे तत्त्वज्ञान समजण्यासाठी.. अनुसरण्यासाठी जगाची धडपड सुरू आहे. गीतेत जीवनावश्यक सारे ज्ञान आहे. जगात लोकप्रिय ठरलेल्या योगाचा उगम या गीतेतच आहे.

        ज्या कुरुक्षेत्रावर गीता सांगितली गेली त्या कुरुक्षेत्रावर दरवर्षी आज मोठा महोत्सव साजरा होतो. इस्कॉनने.. स्वाध्याय परिवाराने गीता तत्त्वज्ञान जगभर पोहोचवलेय.. लाखोंचे जीवन उजळले. आज जगभर गीता जयंती संपन्न होत आहे. गावोगाव सामुहीक गीता पठनाचे विक्रम होत आहेत.

       मानवी जीवन सुखासाठी गीता तत्त्वज्ञान.. ज्ञानाचा महासागर उपलब्ध करुन देणारे श्रीकृष्ण हे खऱ्या अर्थाने जगदगुरु.. विश्वगुरु आहेत. भारताचे भूषण ठरलेल्या या गीता तत्त्वज्ञान ग्रंथांच्या जयंतीच्या आपणांस शुभेच्छा !! 

        वसुदेव सुतं देवं, कंस चाणूर मर्दनम् ।           

        देवकी परमानंदं, कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥


  जय भगवद् गीते,

  जय जय भगवद् गीते,

  हरि हिय कमल विहारिणि,

  सुन्दर सुपुनीते,

  जय जय भगवद् गीते


  कर्म-सुमर्म-प्रकाशिनि,

  कामासक्तिहरा,

  तत्त्वज्ञान-विकाशिनि,

  विद्या ब्रह्म परा,

  जय जय भगवद् गीते


  निश्चल-भक्ति-विधायिनि,

  निर्मल मलहारी,

  शरण-सहस्य-प्रदायिनि,

  सब विधि सुखकारी,

  जय जय भगवद् गीते


  राग-द्वेष-विदारिणि,

  कारिणि मोद सदा,

  भव-भय-हारिणि तारिणि,

  परमानन्दप्रदा,

  जय जय भगवद् गीते


  आसुर-भाव-विनाशिनि,

  नाशिनि तम रजनी,

  दैवी सद् गुणदायिनि,

  हरि-रसिका सजनी,

  जय जय भगवद् गीते


  समता त्याग सिखावनि,

  हरि-मुख की बानी,

  सकल शास्त्र की स्वामिनी,

  श्रुतियों की रानी,

  जय जय भगवद् गीते


  दया-सुधा बरसावनि,

  मातु कृपा कीजै,

  हरिपद-प्रेम दान कर,

  अपनो कर लीजै,

  जय जय भगवद् गीते

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.