निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड? ......६.

 निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......६.

दीपक देशपांडे
अखेर निवडणूक आयोगाचे वतीने आज संध्याकाळी ४वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच अर्थ आज संध्याकाळी ४ नंतर रितसर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि निवडणूक आचारसंहिता लागू होईल.
एवढे दिवस गप्पाटप्पात रमलेला निवडणुक विषय आता गांभीर्याने पुढे येईल आणि शक्याशक्यतेवरचे वलय सहजतेने हटविण्यात येईल आणि समरांगणातील लढाई सुरू होणार   
आहे.  
आश्वासन पूर्ती आणि विरलेल्या आश्वासनांचा पुन्हा एकदा पाढा वाचला जाणार आहे.
नगरसेवक ते नगराध्यक्ष निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. 
नव्या चेहऱ्यावर विश्वास की जून्यांच्या कार्याची पावती आणि पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली जाईल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला(अ)विश्वास आणि उमेदवारांची इच्छा व त्यामुळे कोलांटीउडी मारुन पुन्हा दंड थोपटून निवडणुकीत सामोरे जाण्याची तयारी भल्याभल्यांना तोंडचे पाणी पळाले आहे असा अनुभव प्रदान करेल अशी शंका आहे.
पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला (अ) विश्वास कुणाच्या स्वप्नांवर पाणी फेरुन जाणार आणि वेळेवर दाखवलेली सहानुभूती कुणाची नौका ह्या समरांगणात विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी होणार हेही लवकरच कळणार आहे. 
मतदारांची मते वळविण्यात कोणता जूना पदाधिकारी यशस्वी होणार आणि नवखा उमेदवार कशाप्रकारे जनमत आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी होणार यांवरच या निवडणूकीत यश मिळणार आहे , याशिवाय कोणते मुद्दे ऐनवेळी प्रामुख्याने उपस्थित केले जातील ,त्याबाबतची सकारात्मक भूमिका कोण कशाप्रकारे मांडण्यात यशस्वी होणार यांवरच निकालाचे भविष्य अवलंबून असणार आहे.
मतदार म्हणून आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची तपासणी आणि  खात्री मतदानापूर्वी करुन घ्या नाहीतर ऐनवेळी आपल्याला  नाहक त्रास होऊ शकतो. 
चला तर मग आता विचारांची , बुद्धी चातुर्याची ,धनाची ,बाहुबलाची , लढाई सुरू होतेय यांत आपल्या यशाची दिशा आणि दशा आपल्याला ठरवायची आहे....कारण आता निवडणुका जाहीर होणार आहे यानिमित्ताने,.... धनबलाचा ×बाहुबलाशी आणि बुद्धी चातुर्याशी मोठा रणसंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे.
निवडणूक समरांगणात, कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड? मिळणार हे लवकरच कळेल पण तोपर्यंत....
तुम्ही तयार रहा आम्ही आहोतच... नवनवीन विषय नवीन विचार, नवीन मतप्रवाह घेऊन....

दखल मतदार राजाची

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.