वंदे मातरम्’ १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी महाविद्यालय, मूल येथे देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन
वंदे मातरम्’ १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी महाविद्यालय, मूल येथे देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन
दीपक देशपांडे.
राष्ट्रीय गीत “वंदे मातरम्” च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त कृषी महाविद्यालय, मूल- मारोडा, जि. चंद्रपूर येथे डॉ. व्हि. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या परिसरात “वंदे मातरम्” चे सामूहिक गीत डॉ. व्हि. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. तसेच प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकूण १४४ जणांनी उत्साहाने सहभाग घेतला. या प्रसंगी राष्ट्रनिर्मिती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध संकल्पना मांडणाऱ्या पोस्टर प्रदर्शनाचेही उद्घाटन डॉ. व्हि. जी. अतकरे, यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
त्यापुर्वी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता निबंध लेखन, रील मेकिंग, लोगो डिझाइन आणि कविता या चार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये एकूण ७६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यापैकी निबंध लेखनात ३८, रील मेकिंगमध्ये ८, लोगो डिझाइनमध्ये १६ आणि कवितेमध्ये १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धेमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली.
या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक ऐक्य दृढ करण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment