अनिश्चिततेच्या सावटाखाली होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील पडदा उठणार का?

 निवडणूक समरांगणात:-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?...

अनिश्चिततेच्या सावटाखाली होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील पडदा उठणार का?
दीपक देशपांडे

मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आली असतानाही अजूनही भाजप, काॅंग्रेसच्या वतीनेच नव्हें तर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट,तसेच स्वतंत्र तिसरी आघाडीने उमेदवारी घोषित केली नव्हती आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करुनही दोन्ही शिवसेना गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले नव्हते , तसेच सगळ्यात आधी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने टिना राज ठाकरे यांनी दाखल न केलेल्या नामांकनाने, परंतू त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता,त्यावर पहिला पडदा पाडला तो  शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भारती राखडे यांच्या नावाची घोषणा झाली आणि  त्यांनी नामांकन अर्ज दाखलही केला म्हणून.

भाजपचे वतीने काल संध्याकाळपर्यंत जाहीर झालेले नाव बदलले गेल्याची चर्चा आणि त्यामुळे उभा राहिलेला नवीन वाद आणि काॅंग्रेसच्या गोटातही शिरलेली उमेदवारी बदलाची शक्यता यांमुळे वातावरण तंग होते.

अशा स्थितीत कालच्याच तारखेत एकता समर्थ यांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरीही काॅंग्रेसच्या वतीने त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही ही बाब कुणाला मान्य होत नाहीये ,मात्र हे नामांकन दाखल करताना काॅंग्रेसचे (माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार, नगरसेवक प्रशांत समर्थ हे  दोन्ही भाजपातून काॅंग्रेस मध्ये पक्षांतर करुन आलेले नेते) , पदाधिकारी घनश्याम येनुरकर, दिनेश गोयल आदी उपस्थित होते,असे सांगितले जाते आहे. तसेच यावेळी नगरसेवक पदासाठी प्रशांत समर्थ, ऋतिक दिनेश गोयल यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. तर भाजपचे वतीनेही अनेक नामांकन अर्ज दाखल करण्यात आले असले आणि  नगरसेवक पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अर्धशतक पूर्ण झाले असले तरीही  अजूनही कुणाच्या नावांची अधिकृत घोषणा प्रमुख राजकीय पक्षाने केलेली नाही , आणि आजचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.  

भाजपचे वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत एक रॅली काढून नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त असून काँग्रेसच्या वतीने आज दिनांक १७ नोव्हेंबर ला  नगरपरिषद मूल निवडणूकी करिता पक्षाच्या उमेदवारांचे अधिकृत नामांकन अर्ज  काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटनीस  संतोषसिंह रावत  यांच्या  नेतृत्वाखाली सकाळी ११:०० वाजता भव्य रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे ,तर शिवसेना उबाठा संदीप गिऱ्हे यांचे नेतृत्वात एका रॅलीचे आयोजन करणार असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय समाज पक्ष व आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नेमके कुणाचे आणि किती नामांकन अर्ज दाखल केले जातात आणि ही निवडणूक बहुरंगी बहुढंगी होणार की कशी ह्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता बळावली आहे.

 काॅंग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी आपल्या   १०० कार्यकर्त्यांसह सकाळी ११ वाजेपर्यंत  काँग्रेस कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुदास गुरुनुले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी केले आहे .आजचा दिवस भाजपची यादी जाहीर होणे, आणि बंडखोरी थोपविण्यात पक्षश्रेष्ठींना कितपत यश मिळेल यांवरच अवलंबून असण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत कोणकोणते धुरंधर आपली शक्ती पणाला लावून उमेदवारी मिळवण्यात आणि जनाधार प्राप्त करण्यात यशस्वी होणार हे दोन डिसेंबरला सायंकाळ पर्यंत होणाऱ्या मतदानानंतर तीन डिसेंबरला होऊ घातलेल्या मतमोजणी नंतर उघड होणारच आहे,मात्र तोपर्यंत हा निवडणूक ज्वर टिकून राहीला पाहिजे...... कारण आजच कळणार आहे,.....निवडणूक समरांगणात:- कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?...जनतेचा कौल?

आम्ही तयार आहोत... तुम्ही तयार आहात ना?


   दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.