मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५... तिसरा दिवस.

 मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५... तिसरा दिवस.

आजच्या घडामोडी 
श्रीमती राज ठाकरेंची उमेदवारी मूल नगरपरिषद निवडणुकीत नवीन ट्विस्ट निर्माण करेल काय?

दीपक देशपांडे 

आजच्या तिसऱ्या दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. शनिवारी नामांकन पत्र स्विकारले जाणार असल्यामुळे  आता उरलेत फक्त चार दिवस. जनतेत चलबिचल सुरू झाली. राजकीय पक्ष मात्र सावध भुमिकेतच.

मूलच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे  एकत्रीकरण झाल्याने उबाठा शिवसेनेचे वतीने श्रीमती राज ठाकरे ? यांचे नाव  जाहीर झाल्यानंतरनागरिकांमध्ये प्रचंड उत्साह! आणि भाजप व काँग्रेस गटात प्रचंड खळबळ? अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. 

एकतर आधिच या निवडणुकीत प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळणार आहे त्यात इतर राजकीय पक्षांना आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करताना विलंब होत असून पहले कौन चा खेळ टाळता आला तर आनंद होईल अशी भूमिका प्रत्येक जण घेत असून छोट्या छोट्या पक्षाच्या वतीने उमेदवार निश्चित होत असतांनाच कुण्या बड्या आसामीचा फोन खणानतो आणि हा उमेदवार मिळत असणारी उमेदवारी टाकून बाहेर पडतो आहे. ं 

परिणामी नगरसेवक पदाचा तिढा कायम असताना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासाठी भाजप तयार नाही यादरम्यान भाजपला रामराम करून प्रशांत समर्थ यांनी  काॅंग्रेसकडून आपली  प्रभाग १मधून उमेदवारी  आणि आपल्या पत्नी एकता समर्थ ची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी  जणू  उमेदवारी  मिळालीच आहे, सारखी जाहीर करुन एक मोठा बाॅंबच टाकला आहे, परिणामी काल कालपर्यंत प्रभाग १मधून भाजपकडून उमेदवारी मागणाऱ्यांनी हळूच काढता पाय घ्यायला सुरुवात केली आहे. 

एकीकडे भाजपच्या गोटात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी रांग होती आणि आहे परंतू निवडणुकीत एवढा मोठा खर्च करण्यासाठी कोण पुढे येणार ह्या विवंचनेत असलेल्या उमेदवारांकडून ही एकदम होकार येत नाहीये , याशिवाय जून्या नगरसेवकांनी केलेला दावा अजूनही सोडलेला नाही, परिणामी एकदम नवख्यांना संधी देण्याच्या नादात जून्यांना सांभाळण्याची मोठी कसरत पक्षश्रेष्ठींना करावी लागते आहे, याशिवाय अंतर्गत वादालाही पुन्हा उजागर होऊ द्यायचे नसेल तर सर्व गटतट सांभाळणे आवश्यक झाले आहे. 

ऐनवेळी काॅंग्रेसच्या वतीने दुसरेच नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे येण्याची शक्यताही पडताळून बघितले जात आहे , परंतू हे सारे भाजपच्या उमेदवारांची घोषणा होण्यावर अवलंबून आहे, त्यामुळे अंतर्गत वाद आणि विरोधकांची व्युहरचना यामुळे भाजपला उमेदवार जाहीर करण्यात अनेक अडचणी येत आहेत आणि भाजपचा उमेदवार जाहीर झाल्याशिवाय काॅंग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर होणार नाही ,हे स्पष्ट झाले आहे, तोपर्यंत समर्थ यांचीच उमेदवारी चालणार हे स्पष्ट आहे.

तिकडे स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीनेही करण्यात आली होती परंतू राष्ट्रवादीचा शरद पवार गट जणू संपल्यागत झाला असून अजित पवार गटातर्फे उमेदवारही  भाजपच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर दिला जाईल किंवा पाठिंबा दिला जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही .

तिकडे वंचित आघाडीही आपला उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर करण्याची शक्यता दिसून येत आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाची तर फारशी उपलब्धी नव्हतीच परंतू जी होती तीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शिवसेना उबाठात प्रवेश केल्याने संपुष्टात आली आहे.

बाकी काही अपक्षांची उपस्थिती फारसा परिणाम करण्याची शक्यता नाहीच ,असेही म्हणता येणार नाही,कारण यावेळी क्रास वोटिंग ची शक्यता बळावते आहे.

तुम्ही तयार आहात ना? उद्याची नवीन अपडेट बघण्यासाठी , आम्ही तर तयार आहोतच ,तर मग.... भेटूया उद्या.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.