मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५..सहावा दिवस.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५..सहावा दिवस.
आजच्या घडामोडी आजच्या सहाव्या दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आले . एकुण आजपर्यंत पाच दिवसांत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आले नव्हते मात्र आज सहाव्या दिवशी दिनांक १५/११/२०२५ रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्र.
नगराध्यक्ष करिता - निरंक तर
नगरसेवक करिता -१६ नामांकन अर्ज सादर करण्यात आले आहेत. यांतही भाजपचे वतीने एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला नाही हे विशेष.
निवडणूक आयोगाचे नवीन आदेशानंतर आता आँनलाईन व ऑफलाईन अर्ज आज शनिवार नंतर उद्या रविवारीही नामांकन पत्र स्विकारले जाणार असल्यामुळे आता पुन्हा एकदा उरलेत फक्त दोन दिवस, उद्या आणि सोमवारी, म्हणजे सगळी गर्दी सोमवारी होण्याची शक्यता कमी करुन ती टाळताही येणार आहे.
आम्ही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोतच,कारण या निवडणुकीत उद्याचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण भूमिका वठवत या निवडणुकीचा रागरंगच बदलून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही तयारीत आहोतच पण....तुम्ही तयार आहात ना?
भेटूया उद्या पुन्हा नवीन अपडेट घेऊन.... तोपर्यंत निवडणूक समरांगणात उतरण्यासाठी प्रत्येकाने सज्ज असायलाच हवे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment