मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५.

 मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५

आजच्या घडामोडी 

दीपक देशपांडे 

मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५चा निवडणुक कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू झाला असून आज दिनांक १०नोव्हेंबर २०२५रोजी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर  जमा झाल्याची नोंद झालेली नाही आहे.

ही नोंद बघता उमेदवारी दाखल करणाऱ्यांचा या निवडणुकीत फार उत्साह नसल्याचे निदर्शनास येत असले तरीही आजची ही तर सुरुवात आहे आगे आगे देखो होता है क्या? म्हणत इच्छुक उमेदवार हळूहळू मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता बळावली आहे. यापैकी बरेच जण आँनलाईन पद्धतीने अर्ज सादर करुन शेवटच्या क्षणापर्यंत दस्तऐवज सादर करण्याचीही एक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेला येत आहे.

आता या महायुद्धासाठी समरांगण सज्ज झाले आहे, बघूया कोण- कोण या समरांगणात कोणकोणत्या अस्त्र शस्त्रांचा वापर करून  हे समरांगण गाजवणार आणि या समरांगणात कोणकोणत्या व्युहरचना कशा पद्धतीने समोर येणार ,कोण कोणाची साथ देणार,कोण कुणापासून दुरावतात...... कारण .....चार वर्षांच्या अतिरिक्त कालावधी नंतर ही युद्धभूमी सजवली जाते आहे.

आम्ही सज्ज आहोत.... तुम्हीही सज्ज असायलाच हवे ,या समरांगणातील प्रत्येक हालचाल उघड्या डोळ्यांनी बघता यायला हवी ,ती टिपता यायला हवी आणि  त्याचे जिवंत  समालोचन करता यावे यासाठी आम्ही आमच्या "संजय"ला युद्धभूमीवर तैनात केले आहे.....

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.