मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५.. आठवा आणि अंतिम दिवस.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५.. नामांकन दाखल करण्याचा आठवा आणि अंतिम दिवस.
आजच्या घडामोडी आजच्या आठव्या आणि अंतिम दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक १७/११/२०२५ रोजी दाखल नामनिर्देशनपत्र.
नगराध्यक्षा करिता - कालपर्यंत २+७=९ आणि
नगरसेवक करिता -कालपर्यंत दाखल झालेले १६+३५+६१=११२ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत यांचा अर्थ आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी२+७=९ आणि नगरसेवक नगरसेविका पदासाठी ५१+६१=११२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अशी ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. आजच्या महत्वाच्या घटना....
सर्वप्रथम निवडणूक आयोगाने आणि प्रशासनाने पूर्ण कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.
काँग्रेसच्या वतीने आज दिनांक १७ नोव्हेंबर ला नगरपरिषद मूल निवडणूकी करिता पक्षाच्या उमेदवारांचे अधिकृत नामांकन अर्ज काॅंग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटनीस संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११:०० वाजता भव्य रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते त्याप्रमाणे रॅली स्थानिक काॅंग्रेस भवन जवळून निघाली, महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करुन ती तहसील कार्यालयाजवळ आली तेंव्हा ती प्रवेश द्वारावर थांबवून केवळ उमेदवार व सुचक यांना आत सोडण्यात आले,तर शिवसेना उबाठा मनस्वी संदीप गिऱ्हे यांचे नेतृत्वात एका रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली शिवसेना उबाठा कार्यालयापासून तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आली आणि उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले ,शिवसेना शिंदे गटाच्या वतीने,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीनेही नगरसेवक नगरसेविका पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले, मात्र त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले नाही , परंतू अजून कोणत्या तरी आघाडीचे वतीने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची चर्चा आहे. भाजपचे वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करीत एक रॅली काढून नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे वृत्त होते मात्र ती रॅली काढण्यात आली नाही आणि भाजप कार्यालयातून तहसील कार्यालयात उमेदवार व त्यांच्या सुचक अनुयायी यांनी पायदळ तहसील कार्यालय गाठले आणि आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, यादरम्यान तहसील कार्यालयात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोहोचून तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी मृदुला मोरे मॅडम यांची भेट घेतली,व उमेदवार तथा कार्यकर्ते पदाधिकारी यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
हे वृत्त लिहिपर्यंत नेमके कुणाचे आणि किती नामांकन अर्ज दाखल केले आणि कोणत्या पक्षाकडून कुणाला एबी फार्म मिळाले आणि कोण अधिकृत उमेदवार आहेत याबाबत विस्तृत माहिती हाती आली नाही त्यामुळे ही निवडणूक बहुरंगी बहुढंगी होणार की कशी ह्याचे चित्र रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता बळावली होती मात्र ती यादी उद्या उपलब्ध होणार आहे.
उद्या सर्व नामांकन अर्जाची छाननी होणार असून २१तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून कुणाच्या नामांकनावर आक्षेप घेतला गेला तर २५तारखेपर्यंत त्यावर निर्णय घेतला जाईल आणि त्या दिवसापर्यंत नामांकन परत घेता येईल.२६ तारखेला चिन्ह वाटप करण्यात येणार असून उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दिनांक ३० नोव्हेंबरच्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करता येणार असून दिनांक २डिसेंबर रोजी मतदान आणि ३डिसेंबरला सकाळी १०वाजता मतमोजणी होणार आहे. दूपारी दोन वाजेपर्यंत निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.
निवडणूक समरांगणात:- कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?...जनतेचा कौल काय ?हे भविष्यात कळणार आहे.
मात्र आजची सायंकाळ कुणाची अपेक्षा उंचावणार, आणि कुणाला धोबीपछाड मिळाली? त्यानंतर राग लोभ आणि मानभंग तसेच बंडखोरी आणि नाराजी उजागर करणारी ठरेल काय? ह्याकडे आम्ही लक्ष ठेवून असणार आहोतच , त्यासाठी ..आम्ही तयार आहोतच... तुम्ही तयार आहात ना?
पुन्हा भेटू या एका नव्या अध्यायासह, नवीन घडामोडींचा आढावा घेऊन...
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️


Comments
Post a Comment