कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशित.

कॉंग्रेस पक्षाचा वचननामा प्रकाशित.

मतदारांना धमकावून लोकशाही टिकत नाही, त्यामुळे  पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवुन प्रचार करावा - आमदार विजय वडेट्टीवार.

मूल :-दीपक देशपांडे 

संविधानावर आधारीत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणुकीची आवश्यकता आहे. धमक्या देवून,  मत चोरून आणि पैशाचे पॉकेट वाटुन लोकशाही टिकत नाही. त्यामुळे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम आणि समन्वय ठेवुन प्रचार करावा. असे मत माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी व्यक्त केले 

 नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या वचननामा प्रकाशन प्रसंगी स्थानिक कॉंग्रेस भवन येथे आमदार वडेट्टीवार बोलत होते.  यापूर्वी काल स्थानिक रामलीला भवन समोर पार पडलेल्या विरोधकांच्या सभेत झालेले भाषण म्हणजे पराभवाच्या भितीपोटी पदाचा दुरुपयोग असुन त्यावर आपण लवकरच उत्तर देवु. असा इशाराही त्यांनी दिला. कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह  रावत यांनी कॉंग्रेसपक्षात एकतेचा विचार रुजला असुन पक्षाचे सर्व कार्यकर्ते नाराज न होता एकदिलाने एकता समर्थ यांच्या विजयासाठी परिश्रम घेत असल्याचे स्पष्ट केले व समाधान व्यक्त केले. यावेळी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता  समर्थ यांचेसह सर्व उमेदवारांनी  आपला परिचय करून दिला. शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी संचालन आणि तालुका अध्यक्ष गुरू गुरनुले यांनी आभार मानले. यावेळी काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.