आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मूल येथे जाहीर सभा

 आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची मूल येथे जाहीर सभा

दीपक देशपांडे.

भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने होऊ घातलेल्या नगर परिषद मूल सार्वत्रिक निवडणूक -२०२५ साठी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ बल्लारपूर विधानसभेचे आमदार, माजी मंत्री, सर्वांचे लाडके नेते, विकासपुरुष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ ला सायंकाळी ७:०० वाजता रामलीला भवन मूल च्या पटांगणात आयोजित केलेली आहे. या जाहीर सभेला  भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. हरिशजी शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा  जिल्हा महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले,बल्लारपूर विधानसभा संघटन प्रभारी श्री.रामजी लाखिया यांची उपस्थिती राहणार आहे.या सभेला सर्व भाजपा पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित असे आवाहन भारतीय जनता पार्टी मूल शहराच्या वतीने केलेले आहे.

आजच्या या सभेकडे नागरिकांचे पूर्ण लक्ष लागले आहे, कारण निवडणूक जाहीर झाल्यापासून आजपर्यंत वेगवेगळ्या घटना ,पक्षांतर आणि कोलांटीउड्या मारण्याचे प्रकार व उमेदवार निवडीचे निकष व देऊ केलेल्या उमेदवारीची ऐनवेळी केलेले बदल हे चर्चेतील प्रमुख मुद्दे असणारच आहेत  मात्र आज माजी मंत्री शोभाकाकू फडणवीस यांच्या भुमिकेवरही भाष्य होऊन  त्यातील  सत्य व नेमकं त्यावरील स्पष्टिकरण कसं येणार आणि जनता त्यातून नेमकं काय घेणार हे ठरविण्याची वेळ आली असल्याने आजच्या सभेकडे विरोधकांपासून सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

चला तर मग... सायंकाळी सात वाजता... रामलीला भवन मैदानावर.. भेटूया.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.