मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५उमेदवारी अर्ज

 मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५उमेदवारी अर्ज  दाखल संख्या...




 
दीपक देशपांडे.
न.प.मूल निवडणूक समरांगणात  नगराध्यक्ष पद महिलेसाठी राखीव झाल्याने दाखल ९नामांकनापैकी नगराध्यक्ष पदाचे फक्त ५ नामांकन पत्र  वैध ठरले असून ३अर्ज अवैध ठरले आहेत  मात्र एका उमेदवाराने दोन नामांकन दाखल केले होते परंतू एक नामांकन  रद्द करण्यात आल्याने  २अर्जभरले असल्यास १अर्ज आपोआप रद्द ठरविण्यात येतो  त्यामुळे  आता उरलेत फक्त ५उमेदवार यापैकी अजूनही एखादा नामांकन अर्ज  मागे घेतला गेला तरीही आता ही निवडणूक  अटितटीची  आणि चांगली  चुरशीची ठरणार हे  उघड झाले आहे .
 भाजपाच्या बालेकिल्ल्यात काॅंग्रेसच्या वतीने सैंध लावण्याचा प्रयत्न आणि त्याचे परिणाम लवकरच बघायला मिळणार आणि यावेळी  खरी लढत या परंपरागत दोन राजकीय पक्षातच होणार हे अगदी स्पष्ट  झाले आहे. तर ..... 

१०प्रभागातून २०नगरसेवक निवडीसाठी १०जागांचे ५०% महिला आरक्षण असल्याने   आता या २०जागांसाठी एकुण ११२नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते,त्यापैकी १७नामांकन अर्ज अस्विकृत झाले तर ८ उमेदवारी अर्ज दोन संच सादर केल्याने बाद करण्यात आले परिणामी आता मैदानात ८७ उमेदवार शिल्लक असून  काही प्रभागात सरळसरळ लढती तर काही प्रभागात बहुरंगी लढती होण्याची शक्यता बळावली आहे,तशी नामांकन अर्ज परत घेण्याची २१/११/२०२५ही अंतिम तारीख आहे.

नामांकन अर्ज परत घेण्याची मदत संपल्यानंतर उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत किती नामांकन अर्ज परत घेतले जातात यांवरच या निवडणुकीतील खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षासह २०नगरसेवक निवडीसाठी आजतरी एकुण १२१पैकी९२उमेदवार मैदानात असून २०उमेदवारी अर्ज अस्विकृत करण्यात आले असून ९उमेदवारांनी दोन अर्ज सादर केल्याने ती संख्या कमी झाली  असून सध्या  ९२ उमेदवार निवडणूक समरांगणात असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मृदूला मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

 आरक्षणामुळे मूल नगरपरिषदेवर महिला राज येणार असून उद्या दुपारपर्यंत  नामांकन अर्ज परत घेता येणार आहे ,मात्र दिनांक २६/११/२०२५रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. आणि २/१२/२०२५रोजी २४ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे आणि ३डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.