भ्रमंती✍️विनोद देशमुख 👉येवा, कोकण आपलाच असा...

 भ्रमंती✍️विनोद देशमुख

👉येवा, कोकण आपलाच असा...

कोकण म्हणजे हिरवागार निसर्ग. नारळ, आंबा, सुपारी, कोकम आदी झाडांनी सदैव बहरलेला. त्यात एखाद्या बंगलेवजा हाॅटेलात राहता आलं तर निवांतपणा लाभतो आणि  सुपारीच्या 'एकखांबी' उंच झाडांचा आनंदही लुटता येतो. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील चौल येथील Casa Da बंगल्यातील ही ३५-४० फूट उंच सुपारीची झाडं याचीच साक्ष देतात. तुम्हालाही ती खुणावत आहेत ना .

साडेपाचशे वर्षांपूर्वी मध्ययुगात भारतात आलेला (१४७१ ते १४७४) पहिला रशियन प्रवासी अफान्यासी निकितीन यानं भारताच्या भूमीवर पहिलं पाऊल ठेवलं ते याच चौल गावात. सातवाहन काळापासून चौल हे अतिशय गजबजलेलं बंदर होतं. आता मात्र बंदराचा मागमूसही नाही. दोन हजार वर्षांपूर्वीपासून या बंदरातून इजिप्त, ग्रीस, आखाती देश यांच्याशी प्रामुख्यानं सुती कापडाची निर्यात होत असे. पोर्तुगीजांनी १५२१ मध्ये चौलवर ताबा मिळवला आणि १० वर्षात समुद्रकिनाऱ्यावर सान्ता मारिया दो क्यास्तेलो नावाचा किल्लाही बांधला. आज त्या किल्ल्याची पूर्ण पडझड झाली आहे. चौल बीच तर सुनसानच भासतो. फारसे कोणी तिकडे फिरकत नाही. कालाय तस्मै नम:🙏

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.