राष्ट्रीय समाज पक्ष मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढणार!
राष्ट्रीय समाज पक्ष मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक स्वबळावर लढणार!
दीपक देशपांडे.
महाराष्ट्र राज्यातील बहुप्रतिक्षित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आणि विविध राजकीय पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.
याचाच एक भाग म्हणून गुरुवारी स्थानिक इको पार्क येथील रानवारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रपरिषदेत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव संजय कन्नावार यांनी मूल न.प. निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले,त्याच वेळी भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांशी कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय जाहीर केला,मात्र महाआघाडी वा तिसऱ्या आघाडीचा पर्याय खुला असल्याचे सुतोवाच केले.
या पत्रपरिषदेत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरीही आम्ही मागील निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात जे यश मिळवले होते त्याचा विचार करता यावेळी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे मत व्यक्त केले.
आजच्या घटकेला आम्ही एकाही उमेदवारांची निवड केली नाही मात्र लवकरच सर्व नावांची यादी आणि उमेदवार जाहीर करणार असल्याचे त्यादृष्टीने आमचे स्थानिक पदाधिकारी कार्यरत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले, २१ पैकी एखाद्या उमेदवाराचे नाव सांगा असा प्रतिप्रश्न विचारला असता आम्ही ते लवकरच जाहीर करु असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.
आजच्या एवढ्या महत्वपूर्ण पत्रपरिषदेला स्थानिक एकही पदाधिकारी उपस्थित नसल्याने स्थानिक पदाधिकारी कोण? यांवर ते म्हणतात, पदाधिकारी आपल्या शेतीच्या कामात व्यस्त असल्याने आज उपस्थित होऊ शकले नाही पण त्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे,अधिक आग्रह करता अशोक कोरेवार हे तालुकाध्यक्ष असल्याचे त्यांनी जाहीर केले.
लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात दौरा करणार असून यादरम्यान प्रचार समिती जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुचनेनुसार स्थानिक पदाधिकारी यांना स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार दिले असून याबाबत आम्ही विविध स्तरांवर प्रयत्न करीत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. व तिसऱ्या आघाडीचा पर्याय आणि महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचे स्पष्ट केले.
अजूनपर्यंत कुणाशी गठबंधन झाले नाही मात्र ते होऊ शकते आणि तसे झाले तरच जागा वाटपाबाबत चर्चा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल असेही मत व्यक्त केले,पण भाजपाशी युती नाही म्हणजे नाहीच ,यावर ते ठाम होते.
या पत्रपरिषदेला युवक जिल्हाध्यक्ष साबीर शेख उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment