मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५.. सातवा. दिवस.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५.. सातवा. दिवस.
आजच्या घडामोडी आजच्या सातव्या दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत
दिनांक १६/११/२०२५ रोजी प्राप्त नामनिर्देशनपत्र.
नगराध्यक्षा करिता - २
नगरसेवक करिता - ३५ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले आहेत यांचा अर्थ आजपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी २आणि नगरसेवक नगरसेविका पदासाठी ५१अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र आजही राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची निवड करुन ती जाहीर केलीच नाही,उद्या नामांकन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
उद्या विविध राजकीय पक्षांच्या वतीने शक्ती प्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
आम्ही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोतच,कारण या निवडणुकीत उद्याचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण भूमिका वठवत या निवडणुकीचा रागरंगच बदलून टाकणारा ठरण्याची शक्यता आहे,कारण उद्या राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही तयारीत आहोतच पण....तुम्ही तयार आहात ना?
तुमच्या समोर येणाऱ्या तुमच्या हक्काच्या उमेदवारांची निवड करण्यासाठी.....
भेटूया उद्या पुन्हा नवीन अपडेट घेऊन.... तोपर्यंत निवडणूक समरांगणात उतरण्यासाठी प्रत्येकाने सज्ज असायलाच हवे.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment