मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५...पाचवा दिवस.
मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५...पाचवा दिवस.
आजच्या घडामोडी आजच्या पाचव्या दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एकुण आजपर्यंत पाच दिवसांत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही.निवडणूक आयोगाचे आदेशानंतर शनिवारी नामांकन पत्र स्विकारले जाणार असल्यामुळे आता उरलेत फक्त दोन दिवस, उद्या आणि सोमवारी, म्हणजे सगळी गर्दी सोमवारी होण्याची शक्यता बळावली आहे.
या निवडणुकीत महत्वाची भूमिका वठवणारे दोन प्रमुख पक्ष भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष लुटूपुटूचा खेळ खेळत असून उमेदवारांना मात्र सहनशीलता पणाला लावून सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी बाध्य करीत आहेत असे म्हणावे तर अपक्ष व इतरांच्याही सहनशीलतेची जणूकाही परीक्षाच घेतली जात आहे.
दररोज नवनवीन नांवे चर्चेत येत असून काल कालपर्यंत आघाडीवर असणाऱ्यांची माघार आणि नवख्या चेहऱ्यांची निवड किंवा पुन्हा एकदा जून्यांना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे,अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
उद्या याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल पण तोपर्यंत...
आम्ही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोतच तुम्ही तयार आहात ना?
भेटूया उद्या पुन्हा....
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment