मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५... चौथा दिवस.

 मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५... चौथा दिवस.

आजच्या घडामोडी 
आजच्या चौथ्या दिवशी मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही. एकुण आजपर्यंत  चार दिवसांत एकही नामांकन अर्ज दाखल करण्यात आला नाही.निवडणूक आयोगाचे आदेशानंतर शनिवारी नामांकन पत्र स्विकारले जाणार असल्यामुळे  आता उरलेत फक्त तिन दिवस. आता मात्र उमेदवारांची चलबिचल सुरू झालेली, परिणामी सेतू सुविधा केंद्रात अलोट गर्दी बघायला मिळत आहे.
आजच्या दिवसाचे कामकाज संपेपर्यंत एकाही राजकीय पक्ष अथवा अपक्ष उमेदवाराने आपले नामांकनपत्र दाखल केले नाही मात्र नामांकन पत्रा सोबत जोडायच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आपले सरकार केंद्रात आणि सेतू सुविधा केंद्रात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी रिघ लावलेली दिसून येत असून राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्यात लावलेल्या उशिराने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून काही प्रमाणात नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे.
दुसरीकडे  नगरपरिषद कार्यालयात रहिवासी प्रमाणपत्र आणि गृहकर व पाणीपट्टी कर भरायला जाणाऱ्यांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या असून कर्मचाऱ्यांना कसे बोलायचे यांचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत अनेक जण व्यक्त करीत आहेत आणि ज्यांची ओळख त्यांचे काम आधी हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केला जाणे आवश्यक असल्याचे मत यादरम्यान व्यक्त केले जात आहे.
तहसील कार्यालयाला आतापासूनच वाढवलेला पोलिस बंदोबस्त आणि पोलिसांची तैनाती एका छावणीमध्ये बदलल्याचा भास होऊ लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आधार प्रमाणीकरण, आधार अपडेट आणि वेगवेगळ्या प्रमाणपत्राची आवश्यकता यामुळे नागरिकांची गर्दी वाढली आहे.
राजकारण तापू लागले आहे, आवश्यक कागदपत्रे सादर करताना अनावश्यक मुद्रांक विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे, ऐनवेळी अडथळा नको म्हणून सारे काही मुद्रांकावर छपाई केली जात आहे ,मात्र याबाबत ना प्रशासनातील कुणी ना राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांना याबाबत पुरेपूर माहिती पुरवीत आहेत..... निवडणूक समरांगणात एका राजकीय पक्षांकडून एकाच उमेदवाराला उमेदवारी मिळणार हे माहित असतांनाही दावेदारी करणारा प्रत्येक उमेदवार आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहे.
येणाऱ्या दोन दिवसांत सारे चित्र स्पष्ट होईल परंतू उद्याचा दिवस या साऱ्या घडामोडींचा सर्वोच्च व्यस्त दिवस ठरु शकतो,म्हणूनच आम्ही या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोतच तुम्ही तयार आहात ना?
भेटूया उद्या पुन्हा....

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

    ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.