मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५....२.

 मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५... दुसरा दिवस.

आजच्या घडामोडी 

दीपक देशपांडे 

आज दुसऱ्या दिवशीसुद्धा  एकही नामांकन पत्र सादर करण्यात आले नाही.

भाजप व काँग्रेस पार्टीचे उमेदवार अजूनही निश्चित होऊ शकले नाही त्यामुळे नामांकन दाखल करण्यात आले नाहीत मात्र पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात आवश्यक कागदपत्रे जमा करणे इच्छुक उमेदवारांनी सुरू केले आहेत त्यामुळे सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार केंद्रात गर्दी वाढली आहे.

या सर्व घडामोडी बघता उद्या सायंकाळपर्यंत प्रमुख राजकीय पक्ष आपल्या काही उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता असली तरीही सर्व अपेक्षित उमेदवारांची यादी १५ तारखेलाच निश्चित होण्याची शक्यता बळावली आहे.

मात्र मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत काही जागांवर   उमेदवारी निश्चित करताना   विरोधकांना  परस्पर चाल दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे  किंबहुना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अंमलात आणलेल्या प्रकार  पुन्हा घडण्याची शक्यता वर्तवली जात असून अशा परिस्थितीत बंडखोरी करून  अनेक जण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही , परिणामी ह्या निवडणूक समरांगणात सरळसरळ लढती न होता बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

लवकरच बघायला मिळेल ,ह्या समरांगणात कोण कुणाविरुद्ध दंड थोपटून मैदानात उतरणार , तुम्ही तयार आहात ना? आम्ही तयार आहोतच.....पुढिल अपडेट घेऊन येण्यासाठी....

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.