युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. किशोर जोरगेवार

युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज– आ. किशोर जोरगेवार

चंद्रपूर -डीडिबातमी न्यूज ब्युरो.

आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण,  उद्योजकता या सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्षमपणे काम करत आहेत. मात्र,अजूनही काही ठिकाणी संधी कमी आणि अडथळे जास्त आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाही; ते टिकवण्यासाठी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, रवि गुरुनुले, ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद खेवले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, आशिष देवतळे, राकेश पिंपळकर, सुमित बेले, सुभाष पिंपळकर, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. 

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.