निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......५.

 निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......५.

दीपक देशपांडे
अकारण कुणाचे तरी नांव उचलून उभे केले आणि हीच ती नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून घोषित करण्याचा एक प्रयत्न म्हणजे कर्तव्य शुन्य राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न असून नगर विकासाची संकल्पना राबवायची असेल तर त्या व्यक्तीच्या आजवरच्या कार्याचा आढावा न घेता केवळ निवडणुक लढवायची तर आवश्यक पैशाची तजवीज करता यावी यासाठी मोठ्या पैसेवाल्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न म्हणजे आजवर पक्षासाठी काम केलेल्या  सामान्य माणसाच्या कार्याची दखल न घेता वेळेवर पुढे आलेल्या मोठ्या पैसेवाल्यांच्या  दावणीला  बांधण्याचा प्रयत्न, पक्ष आणि जेष्ठ पदाधिकारी यांची धडपड ही  जनतेला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम ठरेल काय?
 यासाठीच.....
*ऐनवेळी उगवणाऱ्या निवडुंगापासून सावध रहाण्याची आवश्यकता*

मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी याच महिन्यात पहिल्या आठवड्यात घोषणा आणि निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक आयोग त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे, ही बाब हेरून महाविकास आघाडी आपल्यातच कोणती बिघाडी होऊ नये असा प्रयत्न करताना दिसत असली तरी प्रत्येक  राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यता बळावली आहे.
त्यामुळेच....
एकावेळी एका पक्षाकडून उमेदवारी मागितली आणि ती मिळाली नाही तर ऐनवेळी दूसऱ्या पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवण्यासाठी बऱ्याच इच्छुक उमेदवारांनी डाव टाकले असून विविध राजकीय पक्ष व पदाधिकारी दररोज नवनवीन डाव आखत आहेत.
कालपर्यंत शोभेचे रोपटे म्हणून त्यांची जपणूक करुन खतपाणी घालून दिवसागणिक त्याला समृद्ध करण्याचा प्रयत्न करणारे प्रामाणिक व ऐच्छिक कार्यकर्ते कधी निवडूंग..... बणुन त्यावरच झेप घेईल हे  सांगता येत नाही.
सध्या अशा भोळ्याभाबड्या कार्यकर्त्यांची राजकीय पक्ष कार्यालयात वा राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू असून तो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी सांगणाऱ्यांची तर मोठी रिघ लागली आहे, आणि आपणच कसे पात्र आणि लायक आहोत हे दाखवण्यासाठी आजवर कधी नव्हे त्या पद्धतीने, या  भावी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, मोठमोठे  होर्डिंग्ज ,बॅनर, नागरी वस्तीत भेटी, मदतीचे फोटो, समाज माध्यमांवर बातम्या, व्हिडिओ,युट्युब कॅप्शन,रिल्स प्रकाशित करवून त्या माध्यमातून स्वतःला/स्वतःच्या सहचारिणीला/आईला भावी नगराध्यक्ष म्हणून जनतेसमोर प्रस्तुत केले जाते आहे.
या  सर्व प्रकारात त्यांनी केलेली कार्य, जनतेच्या दरबारात त्यांचे स्वतःचे योगदान याबाबत मात्र चकार शब्दही कुणी उच्चारताना दिसत नाहीत.
माजी नगरसेवक म्हणून ,माजी सभापती म्हणून स्वतःचा प्रचार करताना मध्यंतरीच्या चार वर्षांच्या कालावधीत आपण जनतेच्या कोणत्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला हे सांगायला कुणाला वेळ नाही,मात्र प्रशासकीय कार्यकाळात नगरविकास मागे पडला अशी ओरड करायला सगळेच पुढे येत आहेत. प्रशासकीय काळात यांची बंद झालेली दुकानदारी,ठेकेदारी पुन्हा कशी सुरु करता येईल यासाठी तर यांचा हा दिखावा नाही ना?आणि आपल्या एका मतांमुळे निवडून येणारा उमेदवार सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहे आणि त्या महिलेत ही कर्तबगारी आहे काय? हे तपासून पक्षश्रेष्ठींनी व राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी त्याहीपेक्षा त्या उमेदवारांची कार्यकुशलता, वक्तृत्व व कर्तृत्व बघूनच मतदारांनी आपला कौल द्यावा.
कुणी मागणी केली आहे म्हणून,तो/ती पैसे खर्च करण्यासाठी सक्षम आहे म्हणून पण निर्णयक्षमता शुन्य असलेल्या सुशिक्षित असो वा अल्पशिक्षित असो किंवा अशिक्षित असो महिला नगराध्यक्ष निवडून जनतेने आणि राजकीय पक्षांनी आपल्या नगरविकासाची सुत्रे तिसऱ्याच व्यक्तीच्या हाती सोपवू नयेत,अशी जनतेची मागणी आहे.त्यामुळे कुणी कितीही प्रचाराच्या नवनवीन मार्गांचा अवलंब केला, किंवा उमेदवारी मिळवण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला, स्वतःला भावी नगराध्यक्ष  म्हणवीत फिरलात तरीही जनता त्यांना निवडून देईल ह्या भ्रमात कुणी राहू नये.
यावेळी जनता उमेदवारांची सामाजिक, राजकीय,व बौद्धिक क्षमता विचारात घेऊन मतदान करणार आहे, त्यामुळे आमदार, खासदारांच्या कामगिरीवर किंवा  नगरसेवक वा सभापती पदावर कार्यरत तुमच्या सहचराच्या कार्याच्या भरवशावर किंवा  तुमच्या भुतकाळातील कार्याच्या  भरवशावर, किंवा  निवडणुकीत तुम्ही ओतणाऱ्या पैशाच्या जोरावर तुम्हाला नगराध्यक्ष पदावर आरूढ होता येणार नाही,हे पक्कं लक्षात ठेवा.
आज जनता सजग व जागरुक होत आहे , त्यांना आपल्यासाठी काम करणाऱ्या सच्चा  सामाजिक कार्यकर्त्याची, आपल्या  हक्कासाठी लढणाऱ्या समाजसेवकाची,खऱ्या राजकारण्यांची आणि सत्तेसाठी  हपापलेल्या खूर्चीबहादरांची ओळख होऊ लागली आहे,हे विसरता येणार नाही.
पटलं तर घ्या.....
पण यावेळी निवडणूक समरांगणात -कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.... तुम्ही तयार रहा आम्ही आहोतच... नवनवीन विषय नवीन विचार, नवीन मतप्रवाह घेऊन....

दखल मतदार राजाची

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.