IBPS व कृषी संलग्न परीक्षेची यशस्वी सूत्रे" कृषी महाविद्यालय, मूल येथे व्याख्यानाचे आयोजन

  "IBPS व कृषी संलग्न परीक्षेची यशस्वी सूत्रे" कृषी महाविद्यालय, मूल येथे व्याख्यानाचे आयोजन

मूल, दीपक देशपांडे

बीएस्सी. (ऑनर्स) कृषी अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश बी. एस्सी. (ऑनर्स) कृषि अभ्यासक्रमाची पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षांमध्ये उत्तुंग यश प्राप्त करावे या दृष्टीने सन २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा फोरम ची स्थापना करण्यात आली. सदर स्पर्धा परीक्षा फोरम प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय व राज्य स्तरावर घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षांच्या जय्यत तयारीसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करत असते. या व्याख्यानाच्या श्रुखलेतील तिसरे व्याख्यान “IBPS व कृषी संलग्न परीक्षेची तयारी” या विषयावर दि. २९ सप्टेंबर, २०२५ रोजी आयोजित केल्या गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही. जी. अतकरे, अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मूल हे होते. प्रमुख वक्ते म्हणून श्री. विवेक दिवठे, ज्युनिअर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व श्री. सागर कोराटे, सहाय्यक श्रेणी-III (तांत्रिक), फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे दोघेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र यांच्या सूत्रसंचालनाने झाली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून, कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी बनवले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. नागेश नवघरे यांनी केली, ज्यामध्ये त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्टे आणि गरज यावर प्रकाश टाकला.

            कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. विवेक दिवठे यांनी IBPS (Institute of Banking Personnel Selection) परीक्षांचे स्वरूप, आवश्यक अभ्यासक्रम, वेळापत्रक, आणि स्मार्ट अभ्यासपद्धती यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध अभ्यासाचे महत्त्व पटवून देताना, दररोजच्या अभ्यासात सातत्य, सराव चाचण्यांचे महत्त्व व वेळ व्यवस्थापन यावर भर दिला. त्यांनी ८+८+८ म्हणजे ८ तास अभ्यास, ८ तास झोप आणि ८ तास उरलेले काम असा विद्यार्थ्यांना मंत्र दिला. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना सराव परीक्षा नक्की द्या त्याचा खूप फायदा होतो तसेच धैर्य आणि त्याग या दोन गोष्टी तुम्हाला यशाच्या पायरीवर खेचून आणते असे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले. श्री. सागर कोराटे यांनी कृषी अधिकारी, कृषि सेवा, NABARD, FCI, आणि इतर कृषी संलग्न क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये कृषी शाखेतील संधी, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आणि तयारी करताना आवश्यक असणारे कौशल्य याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी विध्यार्थ्यांना गट चर्चा करण्याचे आवाहन केले कारण त्यातून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास होण्यास मदत मिळते. स्वताशी प्रामाणिक राहून अभ्यास केल्यास यशप्राप्ती हि नक्कीच मिळते असे सांगितले. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या विध्यार्थ्यांना यशाचा मूलमंत्र देताना म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त करताना नेहमीच अडसर करणाऱ्या "पाचही ज्ञानेंद्रियांवर प्रभुत्व मिळवा, यश तुमचं होणारच" त्यासोबतच 'प्रचंड इच्छाशक्ती असे विचार निर्माण करते जे यशाच्या दिशेने मार्ग शोधतात आणि शेवटी कृतीकडे नेतात.' त्यांनी सांगितले कि, स्पर्धा हि स्वत सोबत करावी, आपल्यातला आळसाला, वाईट विचारांना, वाईट मित्रांना, वाईट बोलण्याला, वाईट कर्माना व अज्ञानाला हद्दपार करण्यासाठी सदैव तत्पर रहावे असे सांगितले.

            डॉ. व्ही. जी. अतकरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना सांगितले कि, "यश म्हणजे प्रयत्न, विचार आणि कृती यांचा सातत्याने चालणारा एक चक्र आहे, जोपर्यंत आपण आपले ध्येय गाठत नाही तोपर्यंत ते चालूच राहते. सकारात्मक बोलणं, चांगला विचारसरणी, सकारात्मक दृष्टिकोन, शिस्तबद्धता आणि बांधिलकी हीच यशाकडे नेणारी खरी वाट आहे." त्यांनी विध्यार्थ्यांना सर्व स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक असलेल्या सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची हमी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नागेश नवघरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या संपूर्ण कार्यसंघाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या व्याख्यानात कृषी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शक वक्त्यांनी तत्परतेने उत्तर दिले आणि त्यांच्या शंकांचे समाधान केले.

            ही विशेष व्याख्यानमाला विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत फलदायी ठरली. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता, विविध सरकारी व बँकिंग क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी कशी तयारी करावी, याचे योग्य मार्गदर्शन या उपक्रमातून मिळाले. कृषी महाविद्यालय, मूल ने यापुढेही अशा उपयुक्त व विद्यार्थी केंद्रित कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प केला आहे.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.