सुरमय 'घराणेशाही'चा आलेख : द मंगेशकर्स

 सुरमय 'घराणेशाही'चा

आलेख : द मंगेशकर्स

चारही ज्येष्ठ भगिनींबद्दल भरभरून बोलत ह्रुदयनाथांनी वडील मास्टर दीनानाथ ते स्वत:पर्यंतच्या अखंड शतकोत्तरी संगीत प्रवासातील काही मोजके क्षण श्रोत्यांपुढे मांडले आणि त्याआधारे डॉ. सलील कुळकर्णी, सावनी रवीन्द्र यांनी अधूनमधून विविध गाणी रसिकांना ऐकवली. सुरेश भट, ग्रेस, शांता शेळके, ना. धों. महानोर वगैरे अनेक कवींच्या निर्मितीचे किस्से, संगीतकारांच्या लकबी, स्वत: केलेली चित्रपटनिर्मिती याचे स्वानुभव ह्रुदयनाथांनी तपशीलवार सांगितले. "लतादीदी म्हणजे प्रत्येक बाबतीत नैसर्गिक सहजता अन् हेच वैशिष्ट्य तिला सर्वश्रेष्ठ बनवून गेलं," असं त्यांनी आवर्जून नमूद केलं.

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र टाइम्स पुणे आवृत्तीनं आयोजित केलेल्या 'सुरोत्सव' अंतर्गत या कार्यक्रमात उपस्थितांनी मंगेशकरांच्या 'सुरेल' घराणेशाहीचा आनंद घेत भाऊबीज सकाळीच साजरी केली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.