स्वच्छता दूत हेच शहराचे अप्रत्यक्ष आरोग्यरक्षक*... *श्रीराम पान्हेरकर.
स्वच्छता दूत हे शहराचे अप्रत्यक्ष आरोग्यरक्षकच... श्रीराम पान्हेरकर
चंद्रपूर -दीपक देशपांडे.
स्वच्छतेचे महत्व अप्रतिम सांगून गेलेल्या कर्मयोगी गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या उक्ती व कृतीतून घराघरात पोचले असून आजच्या नागरिकांना अस्वच्छतेचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत प्रशासनाने कितीही संसाधने उभारलीत तरी नागरिकांच्या सहकार्य मिळाले तर माझ शहर स्वच्छ शहर असा बहुमान मिळू शकतो. आपल्या शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य निरोगी राहावे यासाठी सेवा देणारे स्वच्छता दूत हे खऱ्या अर्थाने आरोग्य रक्षक असल्यामुळे त्यांना आपुलकीची वागणूक मिळावी असे भावपुर्ण आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर यांनी स्वच्छता दुताचा सन्मान कार्यक्रमात केले.
प्रारंभी स्वच्छता कर्मिचे भारतीय संस्कृती नुसार औक्षवंण करून शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन कृतज्ञता सत्कार अशोक बिहाडे गुणवन्त कामगार यांनी केला.
याप्रसंगी सा. कार्यकर्त्या वन्दना पाटील, निर्मल भजन मंडळच्या शालिनी गिलबिले तसेच प्रिया कुऱ्हेकर, सौं पूजा पान्हेरकर, देवराव कोंडेकर, नंदा बिहाडे ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
ह्या विधायक उपक्रमाचे आयोजन विकलांग सेवा संस्था व आनंद यात्रीद्वारा संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून याकरिता वीज केंद्र कर्मचारी श्री नितीन मुरली राव व श्रीमती नंदा बुरडकर ह्यांनी आर्थिक सहयोग व सहकार्य दिले.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment