डॉ.तनुजा नाफडे यांनी गाजवली पिंक सिटी...

 डॉ तनुजा नाफडे यांनी गाजवली पिंक सिटी..

एका कार्यशाळेत मार्गदर्शन तर एका मैफिलीत गायन..

नागपूर: दीपक देशपांडे.

भारतीय लष्करासाठी भारतीय शास्त्रीय सुरावटीची पहिली मार्शल ट्यून संगीतबद्ध करणाऱ्या प्रसिद्ध संगीतकार आणि स्थानिक आर. एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालयाच्या निवृत्त संगीत विभाग प्रमुख तसेच निवृत्त प्राचार्या डॉ. तनुजा नाफडे यांनी नुकतीच राजस्थानची पिंक सिटी म्हणजेच जयपूर शहर गाजवले आहे. "भाव सूर ताल" या जयपूरच्या ख्यातनाम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने त्यांचे दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

दोन  दिवसांच्या या कार्यक्रमात पहिल्या दिवशी ख्याल गायनाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत डॉ. तनुजा नाफडे यांनी राग यमन अंतर्गत बडा ख्याल, छोटा ख्याल आणि ठुमरी या प्रकारांबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. गायन प्रकाराच्या विविध शैली देखील त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविल्या. 

याच संस्थेतर्फे आयोजित दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात डॉ. तनुजा नाफडे यांची शास्त्रीय संगीताची मैफिल आयोजित करण्यात आली होती. या मैफिलीत त्यांनी राग तोडी अंतर्गत बडा ख्याल आणि छोटा ख्याल आपल्या गायकीच्या वैशिष्ट्यासह सादर केले. त्याच सोबत त्यांनी राग बैरागी भैरव मध्ये एक गायन प्रकार सादर केला. या कार्यक्रमाचा समारोप त्यांनी एका भजनाने केला. या कार्यक्रमात त्यांना हार्मोनियम वर पंडित गिरीराज बालोदिया आणि तबल्यावर पंडित तानसेन श्रीवास्तव यांनी साथ सांगत केली. या सर्वच गायन प्रकारांना उपस्थित श्रोत्यांनी चांगलीच दाद दिली. दोन्ही कार्यक्रमांना शहरातील मान्यवर संगीतप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यात प्रिया दासी महाराज आणि पंडित हेमंत भट्ट या संगीतक्षेत्रातील दिग्गजांचाही समावेश होता.



Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.