निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?
*दखल मतदार राजाची*
निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......
दीपक देशपांडे.पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेपाठोपाठ नगरपरिषद अध्यक्षांच्या आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या असून लवकरच निवडणूक आचारसंहिता लागू होऊन निवडणूकांच्या तारखा जाहीर होणार आणि पुढिल साडेतीन-चार महिने हा निवडणूक आखाडा रंगणार यांत नवीन जुन्या लहानथोरांच्या गळ्यात विजयाची माळ पडलेली असेल तर भल्याभल्यांना तोंडचे पाणी पळाल्याचा साक्षात्कार होणार आहे.
राजकीय उलथापालथ, पक्षबदल आणि कोलांटउड्या व उमेदवारी नाट्य रंगणारच आहेत, परिणामी जनतेला नेत्यांची एकनिष्ठता आणि पक्षप्रेम की खूर्चीप्रेम यांचीही पडताळणी करता येणार आहे.
आश्वासनांची लयलूट आणि आगपाखड यासोबतच ,आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना बघायला मिळणारच आहेत त्यातील काही नेमके क्षणही आम्ही टिपण्याचा प्रयत्न करणारच आहोत.
पण.....
समरांगणात हा डाव खेळला जाण्यापूर्वी या पदावर कोण आरुढ झालेलं बघायला आवडेल यासाठी आम्ही जनतेच्या मनात काय दडलंय?याचा मागोवा घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत , आणि हा खटाटोप निवडणूक जाहीर होऊन निकाल जाहीर होईस्तोवर सुरु असणार आहे नव्हें नवीन लोक पदावर आरूढ होऊन कार्यरत होईस्तोवर सुरु असणार आहे.
त्यासाठी आपल्या भेटीला घेऊन येत आहोत....
लवकरच घेऊन येत आहोत....... जनमनांतील आवाज.......
वाचायला विसरू नका......
*दखल मतदार राजाची*
निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......
आमच्यासोबत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment