निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......

 निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......३.

दीपक देशपांडे.
आता लढाई होणार, आणि शक्ती परीक्षाही!
तब्बल नऊ वर्षांच्या दीर्घ काळानंतर मूल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे.
 या कालावधीतील पहिली पाच वर्षे महिला राजवटीत गेली आणि त्यानंतरची चार वर्षे प्रशासकीय राजवटीत.
यावेळेसतरी सर्वसामान्य नागरिकांना नगरपरिषदेची सत्ता उपभोगता येईल असा विश्वास असणाऱ्या बऱ्याच नेतेमंडळींना लांबलेल्या या निवडणुकीत आरक्षण सोडत जाहीर होताच पहिला झटका दिला.
जणू त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले, त्यामुळे मग मी नाहीतर माझी गृहलक्ष्मी तरी ...म्हणत सत्ताकेंद्र आपल्या घरी राखण्यासाठी त्यांना पुढे करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्या उमेदवारी साठी पायाभरणी करण्यासाठी वरीष्ठ आणि प्रभावी नेतेमंडळींना भेटून आपली दावेदारी अधिक मजबूत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. काही मंडळींना पक्षाकडून उमेदवारी मिळेल की नाही अशी शंका आल्याने यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली तर ..... विरोधात काही जुळवाजुळव करता येईल काय? याचीही चाचपणी सुरू असल्याचे वृत्त हाती येऊ लागले आहे.
समाज माध्यमांच्या जगतात तर दूरदूरपर्यंत शक्यता नसतानाही कुणाच्या तरी नावाला पुढे करुन हवा भरण्याचाही प्रयत्न सुरू झाला आहे.
यादरम्यान राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे आपल्या उमेदवारी ची मागणी करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या प्रक्रियेत शेकडोंच्या संख्येने उमेदवारी साठी अर्ज दाखल होणार आहेत,एका पक्षाने एका दिवसात ही प्रक्रिया पूर्ण केली तर दुसरा पक्ष शांतपणे विचार करून उमेदवारी मागण्यासाठी अर्ज स्विकारणार असल्याचे समाज माध्यमांवर झळकत आहे.
एकुण विविध राजकीय पक्ष कंबर कसून निवडणूक समरांगणात उतरणार असून काही राजकीय मंडळी आपल्याच पक्षाला सुरुंग लावण्याची तयारी करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे, आणि उद्या हीच मंडळी पक्षनिष्ठा आणि आपल्या आजवरच्या कार्याचे गुणगान करीत फिरणार हे सत्य कुणी लपवून ठेवू शकणार नाही.
यावेळी युती, महायुती,आघाडी महाघाडी  की स्वतंत्रपणे  आपली ताकद अजमावून बघण्याचा  दृष्टिकोन सगळ्या राजकीय खेळांना भारी पडणार असून काही राजकीय पक्षांनी आतापासूनच विरोधी सूर लावायला सुरुवात केली असून ,मतदारांची नोंद आणि प्रभागरचना यांवर  भविष्यात करायच्या आरडाओरडा साठी जमीन तयार करायलाही सुरुवात केली आहे. एकेका मतांची किंमत जाहीर करायला सुरुवात केली असून याचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे,ही नेमकी भिती आहे की निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न हे अजूनतरी गुलदस्त्यात आहे. मात्र निवडणूक नामक युद्धभूमी सजवली जाते आहे आणि मतदारांची मते आपल्याला मिळावीत यासाठी नवनवीन विषय जे आजपर्यंत चर्चेत आलेच नव्हते किंवा येवू दिले नव्हते ते विषय चर्चेत आणले जात आहेत.
या निवडणुकीत स्वच्छता,रस्ते नाल्या बांधकाम, विकास, महागाई, बेरोजगारी , शेतकरी कर्जमाफी, यांसारख्या अनेक विषयांवर निवडणूक लढली जाण्याची शक्यता असली तरी हेतूपुरस्सर काही विषयांना हात घातला जाणार की नाही हेही बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
येणाऱ्या आठवड्यात या निवडणुक रणसंग्रामात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत..... आम्ही नजर खिळवून आहोतच .... तुम्हीही आमच्या सोबत असालच ही अपेक्षा.....

दखल मतदार राजाची

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.