कृषि महाविद्यालय, मूल येथे “दीक्षारंभ २०२५–२६” कार्यक्रमाचा यशस्वी समारोप

कृषि महाविद्यालय, मूल येथे “दीक्षारंभ २०२५–२६” कार्यक्रमाचा यशस्वी समारोप

दीपक देशपांडे 

कृषि महाविद्यालय, मूल, जि. चंद्रपूर (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत) येथे नवीन अभ्यासक्रमाच्या ६व्या डीन समितीनुसार बी.एससी. (कृषि) च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित “दीक्षारंभ २०२५–२६” या विद्यार्थी ओळख व मार्गदर्शन कार्यक्रमाचा यशस्वी समारोप पार पडला आणि हे कृषि महाविद्यालयाचे दुसरे वर्ष होते. हा कार्यक्रम १८ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडला. नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शैक्षणिक रचना, संस्था संस्कृती आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती देणे, तसेच व्यक्तिमत्व विकास, नेतृत्वगुण आणि जीवनमूल्यांचे संस्कार करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. 

तीन आठवड्यांच्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी १५ संवादात्मक सत्रांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. या कालावधीत विविध व्याख्याने, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रम, योग सत्रे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. व्हि. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि शिस्त, समर्पण तसेच सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. प्राध्यापक, डॉ. आर. पी. गजभिये, उद्यानविद्या यांनी विद्यार्थ्यांना जीवनकौशल्ये आत्मसात करण्याचे आणि मार्गदर्शक, सहकारी व ज्येष्ठांसोबत मजबूत नाते निर्माण करण्याचे महत्त्व सांगितले, तर डॉ. आशिष लाडे यांनी विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्य, संवादकौशल्य, नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासावर मार्गदर्शन केले.

प्राध्यापक डॉ. आर. पी. गजभिये, डॉ. विशाखा टी. डोंगरे, डॉ. गितांशु डिंकवार आणि श्री. नागेश नवघरे यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. तसेच, डॉ. एस. आर. मुनन्वर, डॉ. प्रविणा बरडे आणि डॉ. गितांशु डिंकवार यांनी समन्वयित केलेल्या क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना आणि उत्साह वाढला. डॉ. एस. वाय. कडू यांनी प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना सिलॅबस आणि मार्किंग सिस्टीमबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. ए. जे. इंगोले यांनी विशिष्ट क्षेत्रातील महत्त्वाच्या व प्रतिष्ठित व्यक्तींशी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली. श्री. एन. आर. नवघरे आणि डॉ. पी. एस. घुबे यांच्या सहकार्यामुळे प्रगतशील शेतकरी श्री. संजय मुप्पावर यांच्या सत्रांमधून विद्यार्थ्यांना कृषितील नवोपक्रम व आधुनिक शेतीतंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. श्रीमती अश्विनी पिंपळशेंडे यांनी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर उपयुक्त माहिती दिली, तर डॉ. आशिष लाडे यांनी योग व आरोग्यविषयक प्रात्यक्षिके व व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व समजावून सांगितले.

कार्यक्रमाचा समारोप ९ ऑक्टोबर २०२५ रोजी “स्वच्छ कॅम्पस – हरित कॅम्पस” या उपक्रमाने झाला, जो ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत राबविण्यात आला. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी दीक्षारंभ कार्यक्रमाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुवर्णा नगराडे यांनी केले. या प्रसंगी डॉ. व्हि. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची माहिती देऊन विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले तसेच करिअर डेव्हलपमेंटविषयी उपयुक्त माहिती दिली. प्रथम वर्षातील विद्यार्थी ईश्वर लोहे, सुमित लोखंडे, प्रज्वल बोलीवार, निखिल डोंगरवार, ऋतुजा करंजेकर आणि भावना चरपे यांनी महाविद्यालयात राबवण्यात आलेल्या दीक्षारंभ उपक्रमांबाबत आपले मत मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. आशिष लाडे यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “दीक्षारंभ २०२५–२६” या कार्यक्रमाने नवागत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि उत्साह निर्माण केला.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.