स्नेहवर्धिनी सोनेरी , विजयादशमी.
स्नेहवर्धिनी सोनेरी
विजयादशमी
*भारतीय संस्कृतीत देवीला परब्रह्मस्वरुपिणी, आदिशक्ती, जगन्माता म्हणून संबोधले जाते. या देवीची महालक्ष्मी.. महासरस्वती, महाकाली ही मुख्य रुपे आपल्याला रज.. सत्व.. तम गुणांचे तारतम्य शिकवतात. नवरात्रात नवदुर्गा अवताराच्या भक्तीभावाने पूजनाने नवउर्जा प्राप्त झालीय.*
*देवीच्या पूजनाकडे बघण्याची अलौकिक दृष्टी पुराणग्रथांनी दिलीय. देवी भूतमात्रात लज्जा, तहान, भूक, शांती, कांन्ति, ऐश्वर्य, वृत्ति, स्मृती.. दया.. तृप्ती.. मातृ.. भ्रान्ति.. चैतन्य रुपात आहे, ज्यामुळे हे मानवी जीवन व्यापलेय. सफल जीवनात यापैकी एकाचीही कमतरता नको म्हणून देवीची आराधना केली जाते हा विशाल अर्थ नवदुर्गा पूजनात आहे.*
*देशात एकात्मता नांदावी, लोक धर्मपरायण व्हावेत, लोकांच्या जीवनात सदैव सुख.. शांती.. निरामय आरोग्य लाभत जीवन आनंदी व्हावे म्हणून आमचे हे संस्कृती सण. आज दसरा अर्थात विजयादशमी. या क्षणभंगुर जीवनात शत्रूत्व भावना संपविण्याची प्रेरणा देणारा सण. शत्रूत्वहीन जग म्हणजे जणू आनंदी स्वर्गच.*
*सोने म्हणजे काय तर आपण जपलेल्या नात्यांचे मुल्य. आज पर्णरुपात सोने एकमेकांना वाटले जाते. जेष्ठांच्या प्रती सोने देत आदरभावनेची रुजवण बालवयापासून केली जाते.*
*आज 'विजयादशमी'. रघुराजाला दान करण्यासाठी कुबेराने सुवर्ण मुद्राचा वर्षाव आपट्याच्या झाडाच्या पानाव्दारे केला म्हणून आयुर्वेदीय वृक्ष आपट्याच्या पानाला सोने म्हणून मान आहे.*
*या दिवशीचे मोठे महत्त्व आहे. प्रभू श्रीरामानी याच दिवशी रावणाचा वध केला. रावणप्रवृत्तीचा नाश करणारी ही विजयादशमी. सत्प्रवृत्तीने रावणप्रवृत्तीवर मिळवलेल्या विजयाने त्रिभूवनात.. अयोध्या नगरीत आनंदी आनंद झाला.*
*छत्रपती शिवाजी महाराज.. तसेच अनेक राजे मोहिमासाठी आजच्या दिवशीच सीमोलंघन करायचे. अज्ञातवासात पांडवानी आपली जी शस्त्र शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवली होती. जेव्हा कौरवानी विराटाच्या गायी पळवल्या होत्या तेव्हा पांडवानी आजच्या दिवशीच ही शस्त्रे काढून.. युद्धात विजय प्राप्त करुन गायी सोडवून आणल्या. असा हा सत्य.. वीरता, शोर्य, पराक्रमाचा साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक दिवस.*
*दसरा देशभर थाटात संपन्न होतो. पण म्हैसूरचा दसरा उत्सव असो वा कोल्हापूरचा उत्सव जगभर प्रसिद्ध आहे. अनेक ठिकाणी रावण दहन होते. रावण दहनाचा अर्थ अहंकाराचे दहन. प्रभू श्रीरामाना दाशरथी म्हणतात. दहा दशेंद्रियावर संयम साधणारे हे प्रभू श्रीराम, तर रावण हा अहंकारी.. गर्विष्ठ होता. श्रीरामाने रावणाचा अंत केला म्हणजे अहंकाराचा अंत केला. मनामनात दडलेल्या अहंकाराचे दहन म्हणजे विजय. या अहंकारावर विजयासाठी ही विजयादशमी.*
*नवरात्रात देवीच्या अनेक स्वरुपांचे पूजन होते. या जगताचे पालन करणारी ही जगन्माता म्हणजे देवी सरस्वती. जगाने सुखात.. समृद्धीत.. शांततेत जगावे म्हणून ती विद्याज्ञान.. विवेक प्रदान करते. आज सरस्वती पूजन. शिक्षण हे केवळ पैशाने प्राप्त होत नाही तर सरस्वती कृपा.. आशीर्वादही हवेतच. तरच विद्याप्राप्तीने जीवनात यश प्राप्त होते. याच भावनेने समस्त विद्यार्थी पाटीवर सरस्वती देवीचे चित्र काढून त्याचे तसेच वहीपुस्तकांचे पूजन करणार. दैवताविषयी आदराचा हा संस्कृती संस्कार.*
*देवी सरस्वतीच्या जवळ शांततेचे मधूर संगीत देणारी वीणा आहे. ही शुभ्रवस्त्रधारी.. कमळाच्या आसनावर विराजमान असून शेजारी राजहंस आहेत. हे माते तुझ्या या दर्शनाने मला परब्रह्मदर्शन घडते. मी तूला शरण आलो आहे.*
*सर्व पाशवी.. दानवी शक्तींवर दैवी शक्तीने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजयादशमी. समाजात एकता निर्माण करुन हे जीवन सुंदर करणाऱ्या या दिवशी आपले हे निरपेक्ष ऋणानुबंध वृद्धींगत होत राहोत. "सर्वेत्र सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामया" हीच सोनेरी मंगलमय शुभकामना !!*
*जय जगदीश्वरी माता सरस्वती*
*शरणागत प्रतिपालनहारी ॥धृ॥*
*चंद्र बिम्ब सम वदन विराजे*
*शीश मुकुट माला गल धारी ॥१॥*
*वीणा वाम अंग में शोभे*
*सामगीत ध्वनि मधुर पियारी ॥२॥*
*श्वेत वसन कमलासन सुंदर*
*संग सखि शुभ हंस सवारी ॥३॥*
*ब्रह्मानन्द मैं दास तुम्हारो*
*दे दर्शन परब्रह्म दुलारी ॥४॥*
*हर्षली अयोध्या नगरी*
*श्रीरामाच्या जयघोषाचे*
*गीत जनांच्या अधरी*
*धन्य दशरथ, धन्य भूमी ही*
*धन्य कैकेयी, कौसल्या ही*
*सम्राटाला ज्या मातांनी*
*वाढविले निज पदरी*
*०२.१०.२०२५
संकलन -अभय बक्षी नागपूर.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344. ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments
Post a Comment