शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-११ ...सर्वसमावेशक हिंदुराष्ट्र

 शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-११

...सर्वसमावेशक हिंदुराष्ट्र

...🕉️  विरोधक संघावर संकुचिततेचा कितीही आरोप करोत, संघाचे हिंदुत्व आणि हिंदुराष्ट्र कल्पना प्रथमपासूनच व्यापक राहिली आहे. संस्थापक डॉ. हेडगेवार यांनाही यात प्रत्येक भारतीय अपेक्षित होता आणि आज शंभरी ओलांडताना सुद्धा संघाला तेच हवे आहे. हिंदू समाजातील जातीपातींना संघाची कधीही मान्यता नव्हती. उलट, "आंतरजातीय विवाह करणार्‍यांची जनगणना झाली तर देशात सर्वाधिक संख्या स्वयंसेवकांचीच भरेल", असा सार्थ आत्मविश्‍वास सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवतांनी गेल्या वर्षी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला होता; तो उगाच नव्हे. समरस हिंदू समाज आणि मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, शीख, जैन या सर्वांसह सशक्त भारताचे हिंदुराष्ट्र हेच संघाचे स्वप्न होते, आहे आणि राहील. ते निर्माण करण्यासाठी जगभरात जे जे चांगले आहे ते ते स्वीकारण्याची खुली तयारी ठेवूनच संघ स्वत:मध्ये वेळोवेळी परिवर्तन करीत आला आहे. सुविद्य सरसंघचालकांच्या मार्गदर्शनाखाली हा महायज्ञ अविरत सुरू आहे आणि त्यातून संपूर्ण भारतीय समाजाचा लाभ होत आहे.

संघावर हुकुमशाहीचा आणि एकचालकानुवर्तित्वाचा ठपका ठेवणार्‍यांसाठी एक खुलासा करणे आवश्यक आहे. सरसंघचालक हे संघाचे प्रमुख असले तरी प्रत्यक्षात त्यांचे काम मित्र, चिंतक आणि मार्गदर्शक (Friend, Philosopher and  Guide) या स्वरूपाचे आहे. संघाचे खरे सूत्रसंचालन सरकार्यवाह करतात. Sarkaryawah is the CEO of RSS. त्यांचे पद नियुक्तीने नव्हे, तर दर तीन वर्षांनी अ. भा. प्रतिनिधी सभेत होणार्‍या निवडणुकीने भरले जाते. या प्रक्रियेत, आणिबाणीतील बंदीकाळ वगळता, एकदाही खंड पडलेला नाही. इतका संघ लोकशाहीवादी आहे ! 

प्रत्येक निर्णय परस्पर विचारविनिमय, सहमती आणि बराच काळ चर्चा अशा मंथनातून करण्याची संघात रूढ पद्धत आहे. त्यानंतर जो आदेश होतो तो सर्वसंमतीनेच. (दिल्लीच्या कार्यक्रमात डॉ. भागवत यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितली होती.) त्यामुळे निर्णयांची नीट अंमलबजावणी होण्यास मदत होते. म्हणूनच संघाचा महावटवृक्ष शंभर वर्षे डौलात उभा राहिला आणि सतत फुलत आहे. हेच संघाचे वेगळेपण आहे. बाहेरच्यांना ज्यांचे आश्‍चर्य वाटते अशा गोष्टी संघात सहजपणे घडताना दिसतात. असा जगावेगळा संघ दुसऱ्या शताब्दीत कशी वाटचाल करतो, याची भारतासह जगालाही उत्सुकता राहणार आहे.  # ११


✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.