*रास्वसंघ शाखा मूलचा विजयादशमी उत्सव सोहळा*
रास्वसंघ शाखा मूलचा विजयादशमी उत्सव सोहळा
दीपक देशपांडे.रास्वसंघ शाखा मूलच्या वतीने राष्ट्रसंघाच्या शताब्दी सोहळा, विजयादशमी उत्सवाचे, स्वरुपात सर्वत्र साजरा केला जात आहे. हेच औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे यंदाही हा कार्यक्रम दिनांक ५ऑक्टोंबर २०२५रोज रविवारी सायंकाळी सहा वाजता क्रीडा संकुल मूल परिसरात आयोजित करण्यात आला होता.दिवसभर पावसाच्या सरी बरसत असतांनाच मूल शहरांत दूपारपासून बरसणाऱ्या पावसामुळे सायंकाळी आयोजित रा.स्व. संघाचा विजयादशमी उत्सव सोहळा साजरा होणार की नाही हा प्रश्न उपस्थित झाला असताना रास्वसंघाच्या मूल तालुक्यातील स्वयंसेवकांनी भर पावसात पथसंचलन ही केले आणि विजयादशमी उत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा केला.
सायंकाळ होता होता आकाशांत विजांचा लखलखाट ढगांचा गडगडाट आणि पावसाच्या कोसळधारा यांमुळे भयावह वातावरण तयार झाले असताना नियोजित वेळेत रास्वसंघाच्या स्वयंसेवकांनी एकत्र येऊन नियोजित वेळेत पथसंचलन करीत नगरवासीयांना एक सुखद धक्का दिला आणि संघाच्या कार्यप्रणाली ची चुणूक दाखवून दिली.
सर पावसातही नगरात पथसंचलन करणाऱ्या या स्वयंसेवकांवर जागोजागी नागरिकांनी महिला व पुरुषांनी फुले उधळून त्यांचे स्वागत केले व फटाक्यांची आतिषबाजी केली.
या कार्यक्रमाला मूलमधिल प्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायी डॉ.तुषार मल्लिनाथ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर लक्ष्मीकांत करिंगवार , जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी प्रमुख उमरेड हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. यावेळी मंचकावर सचिन बल्लावार,नगर कार्यवाह मूल व लेनगुरे जिल्हा कार्यवाह हे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना लक्ष्मीकांत करिंगवार यांनी,
भारताला परमवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर रास्वसंघाचा प्रत्येक स्वयंसेवक यासाठी कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध असणारा हा स्वयंसेवक भारताच्या विकासासाठी व भारताच्या रक्षणासाठी व एकतेसाठी व प्रगतीसाठी नेहमी प्रयत्न करीत राहील,असे ध्येय आम्ही आधिपासूनच स्विकारले आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करीत आहेत हे स्पष्ट करीत संघ स्थापनेचा डॉ हेडगेवार यांचा मुळ उद्देश हाच होता की या देशामध्ये विमुक्त व भटक्या सर्व प्रकारच्या हिंदू समाजाला एकत्र करणे,हाच होता. हे पटवून दिले.
आम्ही विजयादशमी च्या निमित्ताने शस्त्रपूजन करतो याचे मुळ कारण शस्त्र आणि शास्त्र यांचे पालन केल्याशिवाय या देशाचे रक्षण होऊ शकत नाही हे सांगणारा रास्वसंघ आहे.
त्यामुळे आम्ही विजयादशमी उत्सव साजरा करताना शस्त्रपूजन करतो,देवीची उपासना करतो आणि तीच्या विविध रुपांची आराधना करतो. संपूर्ण जग ज्या स्त्रीला अबला म्हणून समजते त्या स्त्रीला सन्मान मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो, आणि एकच मागणं मागतो या देशावर जे संकट आलं आहे जी विपदा आली आहे त्यापासून या देशाचं रक्षण कर.
आम्ही सनातन धर्माचे पालन करणारे लोक या पृथ्वीतलावर असणाऱ्या जल,स्थल,आकाश, पृथ्वी,वायू यांसह वृक्षवल्लींपासून सूर्य चंद्र तारे यांचे पूजन करणारे लोक असल्याचे स्पष्ट केले.
अहिल्याबाई होळकर, झांशीची राणी लक्ष्मीबाई,जिजाऊंच्या कार्याचा गौरव करताना अशाच जननी आज आमच्याही आयुष्यात आल्या पाहिजेत हा विचार पुढे ठेवला, आणि दूर्गापूजेची महिमा कथन केली, त्याचवेळी कुणाला दुखवण्यासाठी किंवा कमी दाखवण्यासाठी नाही तर विजयाचं प्रतिक आणि वाईट विचारांचे दहन व दहा अगणुनांचा नायनाट करण्यासाठी आम्ही रावण दहन करतो हेही लक्षात आणून दिले.
हिंदू राष्ट्र रक्षणासाठी आजवर केलेल्या प्रयत्नांचा इतिहास प्रतिपादन करताना शिवाजी महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला आणि संघाने घेतलेल्या विविध योजनांची माहिती दिली .
आणि हिंदूत्व टिकले पाहिजे ह्यासाठी हे सारे प्रयोजन असल्याचे स्पष्ट केले.
हिंसेला मारायचं असेल प्रतिकार करायचा असेल तर अहिंसाच वापरावी लागेल पण अहिंसा म्हणजे शांतीचा मार्ग नाही आहे,आणि हिंसेवर केलेला प्रतिकार आहे हेही पटवून दिले.
संघाच्या कार्यकर्त्यांनी केरळ,आसाम, अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी किती बिकट परिस्थितीत संघाचे कार्य उभे केले त्याचे वर्णन करताना त्यांनी केलेल्या समर्पित आयुष्य आणि समर्पण भावनेचा ही उल्लेख करताना अशा हजारो लाखो लोकांच्या समर्पणातून व देशाप्रती असलेल्या निष्ठेमुळे आज आपण स्वतंत्र देशात स्वातंत्र्य उपभोगतोय परंतू त्यावरही आक्रमण सुरू असून हा देश तोडण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी राष्ट्रभावना जागृत करुन देशभक्ती जागवून देश अखंड राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादन केली. आज संघाचे समर्थक स्वयंसेवक वाढले आहेत त्या संघकार्याचा विस्तार वाढला आहे तशीच आपली जबाबदारी वाढली आहे आणि विरोधही वाढला असला तरी विश्वासार्हताही वाढली आहे म्हणूनच धर्म टिकवून ठेवण्यासाठी आपण एकसंघ असण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.तुषारजी मर्लावार यांनी संघाच्या कार्याचा आढावा घेऊन गुणगौरव करीत देश एकसंघ राखण्यासाठी संघाच्या कार्याची जनतेला ओळख करून देणे आणि त्यांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करीत त्यांच्या बालपणी ते कसे संघाशी जोडले गेले व त्यावेळी खेळण्यातून व संस्कारातून ते कसे घडले हे कथन सगळ्यांनाच अचंबित करणारे होते. आज संस्कार आणि संस्कृती चे जतन करण्यासाठी संघकार्य अतिशय मोलाची कामगिरी करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पावसामुळे हा कार्यक्रम क्रिडा संकुल परिसरातील योगाभवन सभागृहात घेण्यात आला, कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर ध्वजारोहण, स्वागत, कवायती,सांघिक गीत प्रास्ताविक व मान्यवरांचे मार्गदर्शन अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. नगर पथसंचलनाचे वेळी पोलिस प्रशासनाने उत्कृष्ट बंदोबस्त तैनात केला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करुन यामध्ये सहभागी स्वयंसेवकांचा उत्साह वाढविला होता.
याप्रसंगी मोठ्या संख्येने स्वयंसेवक, नागरिक व संघ प्रेमी महिला व नागरिक उपस्थित होते.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment