मूल येथे रन फॉर युनिटी, सोहळा, संपन्न.
मूल येथे रन फॉर युनिटी, सोहळा, संपन्न.
दीपक देशपांडे.देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५०व्या जयंती निमित्त दि. २८/१०/२०२५ रोजी गांधी चौक मूल येथे शासकीय बँड पथकासह जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेत तसेच
दिनांक ३०/१०/२०२५ रोजी सकाळी मूल शहर येथे व कर्मवीर महाविद्यालय येथे ठिक ०७.१५ वा. सिनयर सिटझन सह रन & वाॅक फॉर युनिटी कार्यक्रम राबविण्यात आलेत
दिनांक ३१/१०/२०२५ रोजी सकाळी मूल शहर गांधी चौक येथून रन फॉर युनिटी ची मिरवणूक काढण्यात आली त्या नंतर पोलीस स्टेशन मूल येथे शालेय विद्यार्ध्याना पोलीस स्टेशन मधील दैनंदिन कामकाज, हत्यारा बाबत माहिती देण्यात आली व पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेत
सदर कार्यक्रम मा. सत्यजित आमले , उपविभागीय पोलिस अधिकारी मूल, विजय राठोड पोलीस निरीक्षक मूल यांचे उपस्थितीत राबविण्यात आलेत.
सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन मूल येथील सर्व अधिकारी, अंमलदार, पोलिस पाटील, सैनिक तसेच नवभारत विद्यालय मूल येथील एनसीसी विद्यार्थी व प्राचार्य, शिक्षक वृंद व मूल शहर येथील मान्यवर व्यक्ती व ८५ ते ९० लोक सहभागी झाले होते
जयंती उत्सव पोलीस स्टेशन हद्दीत उत्साहाने साजरा करण्यात आला.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment