शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-७ ....परिवाराचा प्रचंड पसारा.

 शताब्दीनिमित्त संघाची 'बारा'खडी-७

....परिवाराचा प्रचंड पसारा

--🕉️   शंभर वर्षांचा संघ फक्त संघ म्हणून काम करीत नाही. १९२५ साली विजयादशमीच्या दिवशी डॉ. हेडगेवार नावाच्या द्रष्ट्या महापुरुषाने रोवलेल्या या बीजाचे आता प्रचंड अशा महावटवृक्षात रूपांतर झालेले आहे. हजारो कामांमध्ये लक्ष-कोटी स्वयंसेवक आपापल्या परीने प्रत्यक्षाप्रत्यक्ष रूपात योगदान देत आहेत. डॉ. हेडगेवारांच्या ‘एक टक्का’ लक्ष्याचा विचार केला, तर ते पूर्ण झाले, असे नेमका आकडा (१.४५ कोटी स्वयंसेवक) देऊन सांगणे तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. पण, समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांचा जाणवणारा प्रभाव लक्षात घेतला तर हा आकडा संघाने केव्हाच ओलांडला, हे मान्य करावे लागेल. एक-दोन नव्हे, तर चाळीसवर संस्था संघाच्या छत्रछायेखाली कार्यरत आहेत. यावरून स्वयंसेवकांच्या संख्येचा अंदाज करता येतो आणि संघ आता ‘करोडपती’ झाल्याची खात्री पटू लागते !

संघप्रणीत काही प्रमुख संस्था अशा - राष्ट्र सेविका समिती, विश्‍व हिंदू परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय जनता पार्टी, अ. भा. विद्यार्थी परिषद, अ. भा. ग्राहक पंचायत, वनवासी कल्याण आश्रम, सामाजिक समरसता मंच, स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ, सेवा भारती, क्रीडा भारती, आरोग्य भारती, लघु उद्योग भारती, सहकार भारती, संस्कार भारती, संस्कृत भारती, विद्या भारती, विज्ञान भारती, शिक्षा भारती, अधिवक्ता परिषद, भारत विकास परिषद, भारतीय शिक्षण मंडळ, हिंदू जागरण मंच, हिंदू मुन्नानी, इतिहास संकलन एवम् पुनर्लेखन समिती, कुटुंब प्रबोधन, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन, पूर्व सैनिक सेवा परिषद, प्रज्ञा प्रवाह, राष्ट्रीय शीख संगत, मुस्लिम राष्ट्रीय मंच, इसाई राष्ट्रीय मंच, सक्षम, सेवा इंटरनॅशनल, साहित्य परिषद, शैक्षिक महासंघ, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास, सीमा जनकल्याण मंच, सिंधू सभा, विवेकानंद केंद्र, विश्‍व विभाग. याशिवाय, साप्ताहिक पांचजन्य, विकली ऑर्गनायझर, दैनिक तरुण भारत, साप्ताहिक विवेक यासारखी अनेक नियतकालिके आणि इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमेही स्वयंसेवकांद्वारे चालविली जातात. दुसऱ्या शतकात या संस्थांमध्ये आणखी किती भर पडते, याची सर्वांनाच उत्सुकता राहील.

या प्रत्येक संस्थेत त्यांच्या सोयीनुसार, गरजेनुसार स्वतंत्र व्यवस्था असते. संघाचा एखादा ज्येष्ठ प्रचारक किंवा पदाधिकारी मार्गदर्शक म्हणून या संस्थेकडे लक्ष ठेवून असतो. मात्र, कोणाच्याही दैनंदिन व्यवहारात थेट हस्तक्षेप केला जात नाही. ही अनोखी ‘संघशैली’ आहे ! #७

✍️ विनोद देशमुख

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.