कर्मवीर महाविद्यालय मूल.जि.चद्रपूर चा संघर्ष गजभिये गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित.

 कर्मवीर महाविद्यालय मूल.जि.चद्रपूर चा संघर्ष गजभिये गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित होणार!

दीपक देशपांडे 

 गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत विद्यार्थी विकास विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या  शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी आदर्श विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी म्हणून,  कर्मवीर महाविद्यालय मूल ,येथील विद्यार्थी संघर्ष गजभिये याची निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अनिता वाळके व सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी संघर्ष चे अभिनंदन केले आहे. पदवीचे शिक्षण घेत असतांना संघर्ष ने राष्ट्रीय सेवा योजना , सांस्कृतिक विभागा द्वारे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालय व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले आहे.त्यात  राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर "आव्हान",राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ सामाजिक आणि सांस्कृतिक  महोत्सव "उत्कर्ष" २०२३-२४ बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव इंद्रधनुष २०२४, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,  राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ संशोधन महोत्सव आविष्कार २०२४-२५ लोणेरे‌, जागतिक उद्योजकता शिखर (Global Entrepreneurship Summit), आयआयटी खडकपूर, राज्यस्तरीय "विकसित भारत युथ पार्लमेंट २०२५"मुंबई इत्यादी प्रातिनिधिक स्पर्धांचा समावेश आहे.शिवाय शांत स्वभाव, अभ्यासुवॄती , शिस्तबद्ध वर्तन, भविष्यचे उराशी स्वप्न घेऊन यशाची पायरी चढत असलेला हा  संघर्ष आहे.

संघर्षने या यशाचे श्रेय आई -वडील व आपले गुरुजन यांना दिलेले आहे. दि .०६ ऑक्टोबर,२०२५ रोजी विद्यापीठाच्या वतीने या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाने संघर्षचे अभिनंदन करून पुढील यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

  1. श्री संर्घष गजभिये यांचे मनापासून अभिनंदन.अशीच प्रगती करा व महाविद्यालयाच्या लौकिकात भर घाला,या शुभेच्छे सह_शशिकांत धर्माधिकारी, सचिव,शि.प्र.मंडळ मूल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.