कृषी महाविद्यालय, मूल येथे "प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार"

 कृषी महाविद्यालय, मूल येथे "प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार"

मूल, दीपक देशपांडे

भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे अंतर्गत दरवर्षी कृषी अभ्यासक्रमातील विविध विषयातील पदव्युत्तर प्रवेशासाठी परीक्षेचे आयोजन करत असते या परीक्षेमध्ये उत्तम प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमातील नामांकित विषयामध्ये व त्यांनी निवडलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळवता येतो. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या ICAR-JRF मध्ये कृषीविद्या तसेच उद्यानविद्या आणि MCAER-PG CET प्रवेश परीक्षेत कृषि महाविद्यालय, मूलच्या विद्यार्थ्यांनी कृषी व उद्यानविद्या ह्या दोन्ही विषयात संपूर्ण राज्यात उत्तम रँक प्राप्त करत महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय तथा राज्यपातळीवर गौरवान्वित केले. ICAR-JRF मध्ये रेवत ढोक-५६, वैभव पवार-११७ श्रेयस गेडाम-१२२ व मोहम्मद अलबक्ष-१५९ या प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा  समावेश आहे. MCAER PG CET मध्ये अनुक्रमे उज्वल दखणे, कृषी १८ व उद्यानविद्या १९, साक्षी बिटे, कृषी ३०, मंजुश्री कांबळे, कृषी ३३ व उद्यानविद्या ३६, प्राची डोंगरवार, कृषी ३९ व उद्यानविद्या ३४, पायल आंभोरकर, कृषी ४१ आणि मयूर जांगीलवार, कृषी ५२ यांचा समावेश आहे. उपरोक्त प्रविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा कृषी महाविद्यालय, मूलचे सहयोगी अधिष्ठाता,  डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्गानी त्यांच्यासाठी घेतलेल्या कठोर मेहनतीसाठी त्यांचे आभार मानले तसेच महाविद्यालयीन जडणघडणीवर प्रकाश टाकला. सद्यस्थितीत महाविद्यालयात होत असलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करत वेळेचा सदुपयोग करण्याचे आवाहन केले. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या म्हणाले कि, ICAR JRF आणि MCAER PG CET या अत्यंत स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्ही मिळवलेले उत्तम यश हे केवळ तुमच्या कठोर परिश्रमांचे, सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि आत्मविश्वासाचे फलित आहे. या यशासाठी त्यांनी  विद्यार्थ्यांचे  मन:पूर्वक अभिनंदन केले.

            सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, मूल यांनी आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून कृषिक्षेत्रात आणि इतर क्षेत्रांतही तुम्ही नक्कीच मोठे योगदान द्याल, असा मला पूर्ण विश्वास आहे असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरिता आवश्यक सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. गितांशु डिंकवार, सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे, सहाय्यक प्राध्यापक, मृद विज्ञान यांनी केले.

 दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.