निवडणूक समरांगणात:-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?....
निवडणूक समरांगणात :-कुणाची सरशी कुणाला धोबीपछाड?......
दीपक देशपांडे.चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पद महिलेसाठी राखीव करण्यात आले आणि या पदावर डोळा ठेवून असलेल्या जिल्ह्यातील महान दिग्गजांनी नांगीच टाकली ,कारण यावेळी ह्या पदावर आरूढ होण्यासाठी विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी आसुसलेले होते आणि मोठ्या आशेने गेल्या कित्येक वर्षांपासून आपली जमीन तयार करीत आपल्या मतदारसंघात कार्यरत होते.मात्र आरक्षण सोडतीने सारेच पाण्यात मिसळून गेले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कित्येक सदस्यांनी या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतून काढता पाय घेतला असे विश्वस्त सुत्रांनी कळविले आहे तर नवनवीन इच्छुक उमेदवारांनी कंबर कसून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे,पण... शेवटी अंतिम निर्णय हे .... हायकमांडच्या हातीच असतात म्हणत आपल्या यशापयशाची चाचपणी सुरू केली आहे.
आता गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे, निदान इथे तरी संधी मिळेल ?यांची चाचपणी करायची असे ठरविले पण येथेही आधीच जाहीर झालेल्या आरक्षीत जागांमुळे इथे सुद्धा नकारघंटाच वाजवलेली दिसत आहे.
मूल पंचायत समितीतही महिलाच सभापतीपदी विराजमान होणार असे वृत्त हाती लागले असून आरक्षण सोडती नंतर बरीच हौशी मंडळी नाराज झाली असून आम्ही काय आता....?हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगरपरिषद मूलच्या नगराध्यक्ष पदासाठी तर मोठमोठे दिग्गज नेते गेल्या कित्येक वर्षांपासून जुळवाजुळव करीत नगराध्यक्ष पदासाठी बाशींग बांधून तयार बसले होते त्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर नांगरच चालला असल्याचे सुतोवाच केले जात आहे. उरलेसुरले अवसान गाळले ते नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर ़़झाल्यावर , आणि बदललेल्या प्रभाग रचनेमुळे.
आता कित्येकांच्या स्वप्नांना पंख फुटू लागले आहेत तर कित्येक जण स्वप्न धुळीस मिळाल्याचे वास्तवात अनुभवत आहेत.
तरी अजूनही घोडामैदान दूरच आहे, त्यामुळे उमेदवारी कुणाच्या गळ्यात माळा टाकेल ह्याबाबत सगळेच साशंक आहेत, आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स थ्रिलर मूव्ही प्रमाणे कायमच असणार आहे.
तोपर्यंत घोडेबाजारात डाव ,प्रती डाव लावण्यासाठी लहानमोठ्या दिग्गजांनी आपापल्या शस्त्रांना धार लावायला आणि आपणच कसे योग्य आहोत हे दाखवायला सुरुवात केली आहे.... शेवटी जनता जनार्दन आपला कौल कुणाला देणार हे चित्र अंतिम क्षणापर्यंत स्पष्ट होऊ शकत नाही.
कारण हा रणसंग्राम मुद्द्यांवर होणार की ......?आणखी काही वेगळेच घेऊन येणार हे बघावेच लागणार आहे...... त्यामुळे......
वाचायला विसरू नका......
*दखल मतदार राजाची*
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment