शारदीय नवरात्रोत्सव -आज खंडेनवमी...

         शारदीय नवरात्रोत्सव -आज खंडेनवमी...

   अमरावतीच्या पुरातन.

अंबादेवी मंदिरातून आज खंडेनवमी

    श्रीवर्चस्यमायुष्यमारोग्यमावि

    *धात् पवमानं महीयते ।*

    *धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभंश*

    *तसंवत्सरं दीर्घमायुः*

            *....ऋग्वेद.. श्रीसूक्त*

       *देवीकडे नेमके काय मागावं याचे हे उत्तर. श्रीलक्ष्मी कृपेकरून संपत्ती, बल, आयुष्य, धन, धान्य, गायीसह पशुधन मिळावे. सांपत्तिक स्थीती चांगली असली तरीही सुख उपभोगाला शारीरिक.. मानसिक स्थिती पण उत्तम हवी. आरोग्यदायी महत्वाचे शंभर वर्षांचे दीर्घायुष्य लाभ व्हावा. मग नातवंडे.. पतवंडे यासह आमचे जीवन समृद्ध होवो.*    

        *आज भारतीय संस्कृती महात्म्य सांगणारा नवरात्रातील नवमीचा दिवस. आज देवीचे पूजन.. उपासना.. होमहवन होणार. आरोग्याची काळजी घेणारे आमचे सगळे संस्कृती सण. या नवरात्रात ऋतूबदलाप्रमाणे संयम पाळत उपवास.. धान्यफराळ झाला. यामुळे नवउर्जा प्राप्त झालीय.  आज नवमीला देवीला षड्रस नैवेद्य अर्पण होणार.अर्थात भक्तांनाही प्राप्त होणार*

       *आज खंडेनवमी. शस्त्र पूजनाचा दिवस. संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात उत्साहाने पूजा संपन्न होणार. कारखान्याचा संपूर्ण परिसर स्वच्छता.. सजावट.. रांगोळी रेखाटनाने उजळून निघणार. हार फुलांनी सुशोभित देवीची स्तुती सुरू आहे.*

        *आज प्रत्येक क्षेत्रातील यंत्रसामुग्रीची, आयुधाची, अवजारे, वाहनांची, शस्त्राची नावे वेगळी असतील. अगदी स्टेथोस्कोप ते संगणक, या सर्वांचे हार घालून आज पूजन होणार. आज जीवन हे आयुधे.. अवजारे.. शस्त्र यांशिवाय अशक्यच. या निर्जीव, जडाच्या कृपेनेच आमचा जीव सुखी झालाय.. होत आहे. मग त्यांचा सन्मान हवाच. आज त्यांचे भाविकतेने पूजन होणार.*

        *नवरात्रात देवीच्या उपासनेत मांगल्याची कामना करताना वाचले जाते ते स्तोत्र म्हणजे श्रीसूक्त अर्थात लक्ष्मी सुक्त. संस्कृतमधील नादमय.. छंदोबद्ध असे हे वैदिक स्तोत्र. हे श्रीसुक्त ऋग्वेदात नंतर परिशिष्ट म्हणून समावेश झाले म्हणून याला खिलसूक्तही म्हटले जाते. १०० ग्रंथ अनुवाद करणाऱ्या अमरावतीच्या संत अच्युत महाराज यांनी याचाही अनुवाद मराठीत उपलब्ध केलाय.*    

        *अमरावतीच्या अंबादेवी. या देवीचा पौराणिक संदर्भ आहे. हिच्याच दर्शनासाठी आलेल्या रुख्मिणीचे हरण श्रीकृष्णानं केले होते. दीड हजार वर्षे जुने देवीचे हे मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका या अंबादेवीला आली होती. इथे लगतच जनार्दन स्वामी यांच्यासाठी प्रकटलेली एकवीरा देवी पण आहे.*  

        *आज भक्तिभावाने श्री महालक्ष्मी अष्टकाचे पठण करूयात.*  

                *अथ श्री इंद्रकृत*

           *श्री महालक्ष्मी अष्टक*


        *॥ श्री महालक्ष्म्यष्टकम् ॥*

              *श्री गणेशाय नमः*


  *नमस्तेस्तू महामाये*

  *श्रीपिठे सूरपुजिते ।*

  *शंख चक्र गदा हस्ते*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥१॥*


  *नमस्ते गरूडारूढे*

  *कोलासूर भयंकरी ।*

  *सर्व पाप हरे देवी*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥२॥*


  *सर्वज्ञे सर्ववरदे*

  *सर्वदुष्ट भयंकरी ।* 

  *सर्व दुःख हरे देवी*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥३॥*


  *सिद्धीबुद्धूीप्रदे देवी*

  *भुक्तिमुक्ति प्रदायिनी ।*

  *मंत्रमूर्ते सदा देवी*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥४॥*


  *आद्यंतरहिते देवी*

  *आद्यशक्ती महेश्वरी ।*

  *योगजे योगसंभूते*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥५॥*


  *स्थूल सूक्ष्म महारौद्रे*

  *महाशक्ती महोदरे ।* 

  *महापाप हरे देवी*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥६॥*


  *पद्मासनस्थिते देवी*

  *परब्रम्हस्वरूपिणी ।*

  *परमेशि जगन्मातर्र*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥७॥*


  *श्वेतांबरधरे देवी*

  *नानालंकार भूषिते ।* 

  *जगत्स्थिते जगन्मार्त*

  *महालक्ष्मी नमोस्तूते ॥८॥*


  *महालक्ष्म्यष्टकस्तोत्रं*

  *यः पठेत् भक्तिमान्नरः ।* 

  *सर्वसिद्धीमवाप्नोति*

  *राज्यं प्राप्नोति सर्वदा ॥९॥*


  *एककाले पठेन्नित्यं*

  *महापापविनाशनं ।*

  *द्विकालं यः पठेन्नित्यं*

  *धनधान्य समन्वितः ॥१०॥*


  *त्रिकालं यः पठेन्नित्यं*

  *महाशत्रूविनाशनं ।*

  *महालक्ष्मीर्भवेन्नित्यं*

  *प्रसन्ना वरदा शुभा ॥११॥*


*॥ इतिंद्रकृत श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः संपूर्णः ॥*

  

  *‼आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि ‼*

        *‼योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोsस्तुते ‼*

        *आदि आणि अन्तरहित असणाऱ्या, विश्वाची आदिशक्ती, योगातून उत्पन्न होणाऱ्या हे महान ईश्वररुपिणी देवी महालक्ष्मी, तुला नमस्कार असो.* 

                ०१.१०.२०२५

संकलन -अभय बक्षी नागपूर.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344.               ✍️Ddbatmi-m2M✍️


Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.