निवड , अभिनंदन आणि शुभेच्छा!

शिवसेना उबाठा चे मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ संघटक म्हणून नितीन येरोजवार यांची नियुक्ती, अभिनंदनाचा वर्षाव.


दीपक देशपांडे.
दिवाळीच्या तोंडावर शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर  संदीप गिऱ्हे यांचे  सुचनेनुसार मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांची नव्याने निवड करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्या बळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्यात येत असून यादृष्टीने संघटना बांधणी करताना मूल येथील माजी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतलेली भरारी विचारात घेता त्यांना मूल बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ संघटक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे शिवसेना उबाठा च्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत असून समाजातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

मूल नगरातील शिवसेनेचे जूने निष्ठावंत कार्यकर्ते महेश चौधरी यांनी आपल्या जून्या मार्गदर्शक पदाधिकारी नितीन येरोजवार यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,युवा नेते आदित्य ठाकरे, जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांचे आभार  व्यक्त करीत मूल तालुक्यातील तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवीन  पदाधिकारी यांचे नेतृत्वात पक्षाच्या बांधणीला आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मजबूत संघटन उभारणीला सहकार्य करण्याचे जनतेला आवाहन केले आहे. 


दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

















Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.