ICAR-JRF व MCAER- PG परीक्षेत कृषि महाविद्यालय, मूल च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
ICAR-JRF व MCAER- PG परीक्षेत कृषी महाविद्यालय, मूल च्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
दीपक देशपांडे.भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुसा, नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात येणारी कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये कृषि महाविद्यालय, मूल च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत उत्तुंग यश प्राप्त केले आहे. राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातील सर्वच राज्यांतील कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी भाग घेतात. बी. एस्सी. (ऑनर्स) कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, कृषी अभियांत्रिकी इ. पदवी प्राप्त विद्यार्थी या अभ्यासक्रमात येणाऱ्या विविध विषयाकरिता पात्र असतात. या परीक्षेमध्ये उत्कृष्ट रँक प्राप्त केल्यास देशभरातील नामांकित कृषी विद्यापीठांमध्ये एम. एस्सी. (कृषी) प्रवेश मिळवता येतो डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या व अपुऱ्या सोयीसुविधा असलेल्या कृषी महाविद्यालय, मूल च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवित उत्कृष्ट रँक प्राप्त केल्या आहेत. यामध्ये कृषी विद्याशास्त्र या विषयात रेवत ढोक ५६ वी रँक (राखीव प्रवर्ग) व ५२२ वी रँक (सामान्य प्रवर्ग), वैभव पवार ११७ (राखीव प्रवर्ग) १८९१ (सामान्य प्रवर्ग), तसेच उद्यानविद्याशास्त्र या विषयात श्रेयस गेडाम १२२ (राखीव प्रवर्ग) १०८८ (सामान्य प्रवर्ग), मोहम्मद अलबक्ष १५९ (राखीव प्रवर्ग), १८०० (सामान्य प्रवर्ग). अशाप्रकारे रँक प्राप्त करत कृषी महाविद्यालय, मूल चे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्वल केले.
कृषी महाविद्यालय, मूलच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर घेण्यात येणाऱ्या MCAER PG-२०२५ या परीक्षेत सुद्धा कृषी व उद्यानविद्या या विषयांत घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये अनुक्रमे उज्वल दखणे कृषी (१८ वी रँक) उद्यानविद्या (१९ वी रँक), साक्षी बिटे कृषी (३० वी रँक), मंजुश्री कांबळे कृषी (३३ वी रँक) उद्यानविद्या (३६ वी रँक), प्राची डोंगरवार उद्यानविद्या (३४ वी रँक) कृषी (३९ वी रँक), पायल अंभोरकर कृषी (४१ वी रँक) तर मयूर जांगीलवार कृषी (५२ वी रँक). विशेष म्हणजे सदर दोन्ही राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथमच यश संपादन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यापीठ स्तरावरून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "हे यश हे विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या पाठबळाचे फलित आहे. विद्यार्थ्यांचे यश हे संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानास्पद बाब आहे." त्यांचे यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये भरभरून यश संपादन करण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा फोरमची स्थापना करण्यात आली आहे. या यशानंतर महाविद्यालयामध्ये आनंदाचे वातावरण असून भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक
9403285344
✍️Ddbatmi-m2M✍️
Comments
Post a Comment