बिबट दडलाय ते..... बिबट मृतावस्थेत!

 बिबट दडलाय ते...बिबट मृतावस्थेत!







मूल, दीपक देशपांडे 

आज मंगळवारी दुपारी सावली वनपरिक्षेत्रातील मूल तालुक्यातील टेकाडी येथे श्री सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्म च्या बाजुच्या शेतातील झुडपात बिबट दडुन असल्याची माहिती स्थानिक वनरक्षक यांना मिळाली.  चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनाधिकारी श्री तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक श्री तरसे, सावली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री धुर्वे यांच्या सुचनेनुसार त्या बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेण्यात आला.  चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर तथा अतिशीघ्र कृती दल चे कर्मचारी, वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. व त्या बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षित पणे पकडण्याची तयारी करण्यात आली, परंतु झुडपात पहाणी करीत असतांना तो बिबट आधीच मृत झालेला होता.

 ही माहिती वरिष्ठ वनाधिकारी यांना देण्यात आली व त्यांचे मार्गदर्शनात मृत बिबटला सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात नेण्यात आले व तीथे डॉ कुंदन पोडचलवार यांनी त्या मृत बिबट्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे समक्ष शवविच्छेदन केले नंतर त्याचे दहन करण्यात आले.  यावेळी डॉ.कुंदन पोडचलवार,क्षेत्र सहाय्यक एन.एस.सिडाम, वनरक्षक एस.डब्लू.बोनलवार,वनरक्षक लंकेश आखाडे,अतीशीघ्र कृती दलाचे  शुटर अविनाश फुलझेले,किशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे,  तरूण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर अक्षय दुम्मावार टेकाडी पी आर टी ची टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते.

दीपक देशपांडे,✍️मुख्य संपादक

            9403285344

     ✍️Ddbatmi-m2M✍️

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठी बातमी:-मूल तालुक्यातील चिचाळा येथे रात्रभर अस्वलीचा हैदोस!

मूल तालुक्यातील गुणवंत मूलचा अभिनय डॉक्टर झाला, आईचे स्वप्न साकारले.

दोन वर्षांपूर्वी हरवलेली व्यक्ती सापडली,मूल पोलिसांची कामगिरी.